कॉंग्रेसच्या निर्णयानंतरच राष्ट्रवादी निर्णय घेणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेसच्या निर्णयानंतरच राष्ट्रवादी निर्णय घेणार

मुंबई – राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपापल्या नेत्यांबरोबर बैठका घेतल्या आहेत. मात्र या बैठकांमध्ये अंतिम निर्णय झाला नसून कॉंग्रेसने सायंकाळी ४ वाजता पुन्हा बैठक बोलावली आहे. तर काँग्रेसचा निर्णय होईपर्यंत राष्ट्रवादी निर्णय घेणार नाही, अशी भूमिका घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय येण्याची शक्यता असून त्यावरून शिवसेनेच्या सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

‘काँग्रेसचा निर्णय होईपर्यंत राष्ट्रवादी निर्णय घेणार नाही, कारण आम्ही एकत्रित निवडणूक लढवली होती. पवारसाहेबांनी काँग्रेसला विचारुनच निर्णय घेण्यास सांगितलं आहे. शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार नाहीत’, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बैठकीनंतर बोलताना नवाब मलिक यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास राष्ट्रवादी अनुकूल असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले. मलिक म्हणाले, ‘आज सकाळी पक्षाची बैठक झाली. त्यात राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. दिल्लीतही काँग्रेसच्या कार्यकारी कमिटीची चर्चा झाली आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी अजून काहीही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. राज्यातील नेत्यासोबत चर्चा केल्यानंतर काँग्रेस निर्णय घेणार असल्याच त्यांनी सांगितले आहे. पर्यायी सरकार देणे ही आमची जबाबदारी आहे. सरकार शिवसेनेसोबत बनवणार हे खरे असले तरी काँग्रेसचा निर्णय होईपर्यंत आम्ही काहीही भूमिका घेणार नाही’, असे मलिक यांनी सांगितले.

सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी दिलेले निमंत्रण भाजपने नाकारले आहे. भाजपच्या कोअर कमिटीने काल राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपला निरोप कळवला. शिवसेनेची सोबत येण्याची इच्छा नसल्याचे सांगत भाजपने असमर्थता दर्शवली. आता शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करायचा झाल्यास त्यांच्यासमोरही संख्याबळाची जुळवाजुळव करण्याचे आव्हान असेल. या आव्हानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भुमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. शरद पवार यांनी आज सकाळी १० वाजता कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडली.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव १५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस १४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More