कॉंग्रेसचे ‘दोन’ नेते थोडक्यात बचावले – eNavakal
महाराष्ट्र

कॉंग्रेसचे ‘दोन’ नेते थोडक्यात बचावले

नागपूर – काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या बसला अपघात सुदैवाने टळला आहे. समोरुन येणाऱ्या डंपर चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने हा अपघात थोडक्यात टळला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण थोडक्यात बचावले आहेत. जनसंघर्ष यात्रा बसमधून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे नेते प्रवास करत होते.

राज्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र, बांधकाम खात्याला तसेच संबंधित विभागाला जाग येत नाही. आजही असाच मोठा अपघात होता टळला. मोर्शीवरून चांदूरकडे जाताना रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाच मार्गावरुन वाहतूक सुरू होती. त्यावेळी अपघाताची घटना टळली.

डंपर चालकाने वेळेत प्रसंगावधान ठेवत डंपर बाजूला घेतला आणि धडक टळली. मात्र, त्यामुळे डंपर रस्त्याच्या कडेला मातीत रुतला. खानापूर गावाजवळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे रस्त्याची एकच मार्गीचा सुरू आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यावर काँग्रेस नेत्यांची मोठी बस आणि डंपर समोरासमोर आल्याने ही घटना घडली. या बसमध्ये काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते बसले होते. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आदी नेते होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More