गिरवले कुटुंबिय अखेर अंत्यसंस्कारासाठी राजी – eNavakal
News गुन्हे महाराष्ट्र राजकीय

गिरवले कुटुंबिय अखेर अंत्यसंस्कारासाठी राजी

अहमदनगर – पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर कौलास गिरवले यांच्या नातेवाईकांनी सुरुवातीला अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता, मात्र गिरवले कुटुंबिय अंत्यसंस्कार करण्यास राजी झाले आहेत. थोड्याच वेळापूर्वी गिरवले यांचा मृतदेह अहमदनगर येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला आहे. थोड्याच वेळात त्यांचावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. कोठडीतील नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा अहवाल डॉक्टारांनी  दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आश्वासन दिले आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक कैलास गिरवले यांचे कुटुंब कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यासाठी आले आहेत .यात जोपर्यंत गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तोपर्यंत कैलास गिरवले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचा आक्रमक पवित्रा गिरवले कुटुंबीयांनी घेतला आहे. यात प्रकरणात सीआयडीकडे हा गुन्हा वर्ग झाल्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात तांत्रिक अडचण येत असल्यामुळे अंत्यसंस्कार करून घ्यावे अशी नातेवाईक यांना पोलीसांकडून मनधरणी करण्यात येत आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.  पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला असून आज त्यांचा मृतदेह नगरकडे रवाना करण्यात आला आहे. आता या दुहेरी हत्याकांडाच्या तपासाला वेगळे वळण लागल्याची शक्यता आहे. कारण कैलास गिरवले यांचा मृत्यू पोलीस कोठडीतच झाला असल्याचा आरोप गिरवले यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

यात पोलीस कोठडीत मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांचे जावई शशिकांत गायकवाड आणि भाऊ बाबासाहेब गिरवले यांनी केला आहे. आज सकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयातून नगरकडे रवाना करण्यात आला. यात कोठडीतील नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा डॉक्टारांचा अहवालमध्ये निष्पन्न झाले असल्याचे नगर पोलीस यांच्या वतीने सांगण्यात आल्याची माहिती समजत आहे.  कैलास गिरवले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा पोलीस कोठडीत मूर्त्यू झाला असून रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधिकारी दिलीप पवार, श्रीधर गुप्ते, पोलीस काळे, यांच्यासह  दोन ते तीन पोलीस कर्मचारी यांच्यावर बाळासाहेब गिरवले यांच्या फिर्याद वरून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा असा अर्ज देण्यात आल्याचे समजत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पालघरमध्ये 5 बाईक अ‍ॅम्ब्युलन्स दाखल

वाडा- जिल्ह्यातील ज्या अतिदुर्गम भागात मोठी अ‍ॅम्ब्युलन्स जात नाही त्या ठिकाणच्या रुग्णांना आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 5 आरोग्य केंद्रांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

ग्रामीण भागातील चिंबोरी, मुठ्यांना शहरी भागात वाढली मागणी

विक्रमगड- पावसाळा सुरू झाला की सार्‍यांनाच वेध लागतात ते म्हणजे रानभाज्यांसोबत काळ्याभोर चिंबोर्‍या आणि खेकड्यांचे. खवय्यांसाठी मेजवानी ठरणार्‍या चिंबोर्‍या आणि खेकडे विक्रमगड बाजारात तसेच...
Read More
post-image
News मुंबई

बेस्टमध्ये नवीन 500 कंत्राटी कामगारांची भरती

मुंबई,-बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात बेस्टच्या आर्थिक तोट्याचे कारण पुढे करत प्रशासन आणि कमिटीने खासगी कंत्राटदाराकडून 500 नवीन कंत्राटी कामगार भरती केले आहेत. त्यामुळे गेले...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पलुच्या धबधब्यावर 31 जुलैपर्यंत जाण्यास बंदी

विक्रमगड- जूनच्या शेवटच्या आठवडयात विक्रमगड व परिसरात दमदार असा पाऊस झाल्याने नदी, नाले, ओव्हळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. शेतामध्ये पाणी साठलेले आहे व...
Read More
post-image
News महाराष्ट्र

म्हारळ हद्दीतील डम्पिंग ग्राऊंड ‘ओव्हर फ्लो’

उल्हासनगर- कॅम्प नंबर 1 परिसरात म्हारळच्या हद्दीत असलेले डम्पिंग ग्राऊंड ओव्हर फ्लो झाल्याने उल्हासनगर पालिकेने कॅम्प नंबर 5 च्या भागात दुसरे डम्पिंग ग्राऊंड तयार...
Read More