केरळ आयसीसच्या निशाण्यावर, हायअलर्ट जारी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

केरळ आयसीसच्या निशाण्यावर, हायअलर्ट जारी

केरळ – केरळच्या किनारपट्टीवर आयसीस (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या हालाचाली वाढत आहे. शनिवारी रात्री केरळच्या समूद्र किनाऱ्यावर आयसीसचे १५ दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यानंतर केरळसह संपूर्ण भारतात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केरळ पोलिसांनी किनारपट्टी भागात अलर्ट दिला आहे. यासाठी सिनिअर अधिकारी देखील तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय किनारपट्टीवर मासेमारीसाठी येणाऱ्या प्रत्येक मच्छिमाराचीही कसून चौकशी केली जात आहे. श्रीलंका बॉम्बस्फोटानंतर केरळमध्ये गुप्तचर यंत्रणेकडून सातत्याने अलर्ट करण्यात येत होते. मात्र शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी लक्षद्वीमार्गे केरळ किनारपट्टीवर एक बोट पाहिली. या बोटीत 15 दहशतवादी असल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. या संशंयानंतर गुप्तचर यंत्रणांनी केरळ पोलिसांना किनारपट्टीवरील सुरक्षेत वाढ करण्याचा आदेश दिले आहे. तसेच संपूर्ण भारतात हाय अलर्टही जारी करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल – संजय राऊत

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सत्तास्थापनेबाबत उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सरकार सत्तेत येईल’, असा विश्वास व्यक्त केला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

शरद पवार आज मोदींना भेटणार! समीकरणे बदलणार?

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. संसद भवनात आज दुपारी १२.४० वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

‘अपनों के विघ्नों ने घेरा’ – संजय राऊत

मुंबई – दररोज ट्विट आणि पत्रकार परिषदेतून भाजपावर तोफ डागणारे संजय राऊत यांनी आज ‘अपनों के विघ्नों ने घेरा’ असे म्हणत भाजपाला डिवचले आहे. आज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

ज्युलियन असांजेला दिलासा; बलात्काराचा गुन्हा रद्द

लंडन – अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजे याला मोठा दिलासा मिळाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘चैत्या’ आता तेलुगू चित्रपटात झळकणार

मुंबई – अभिनेते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटातून झळकलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे अर्थात सर्वांचा लाडका चैत्या आता तेलुगू चित्रपटात दिसणार...
Read More