केरळसाठी अंबरनाथ नगरपरिषदेची मदत – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

केरळसाठी अंबरनाथ नगरपरिषदेची मदत

अंबरनाथ- केरळमध्ये आलेल्या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पूरग्रस्तांना अंबरनाथमधून मदत पाठवण्यात येणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नगरपालिका सभागृहात नगराध्यक्षा मनिषा वाळेकर आणि व्यापारी संघटनेच्या वतीने मंगळवारी शहरातील नागरिकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल , केरळ समाजाचे शहराध्यक्ष गोपालन व्यासपीठावर उपस्थित होते. केरळमध्ये आलेल्या संकटकाळात विविध संघटनांनी मदत देण्याचे जाहीर केले. अंबरनाथ नगरपालिकेचे पालिकेचे कर्मचारी त्यांचा एक दिवसाचा पगार देणार असून नगरसेवक 55 हजार रुपयांची मदत देणार आहेत. व्यापारी संघानेसुद्धा भरीव मदत देण्याचे घोषित केले आहे. निसर्गाने नटलेल्या केरळवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीसाठी आवश्यक ती मदत केली जाईल असे नगराध्यक्षा वाळेकर म्हणाल्या. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने दीपक चव्हाण यांनी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी एक दिवसाचा पगार यासाठी देणार असल्याचे जाहीर केले. नगरसेवकांतर्फे 55 हजार रुपयांची मदत देणार असल्याचे नगरसेवक सुभाष साळुंके यांनी जाहीर केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More