केरळला युसुफ अली करणार होते ७०० कोटींची मदत – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

केरळला युसुफ अली करणार होते ७०० कोटींची मदत

तिरूअनंतपुरम – केरळ पूरग्रस्तांसाठी दुबईने ७०० करोडची मदत जाहीर केली होती. परंतु ही मदत भारत सरकारने नाकारली. यानंतर या विषयावर अनेक वेळेस चर्चा झाली. आता मात्र यावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मौन सोडले आहे. दुबईतील प्रसिद्ध उद्योजक युसुफ अली हे केरळमध्ये जन्माला आले आहेत. त्यांनीच मुख्यमंत्र्यांना या मदतीविषयी माहिती दिली. तसेच युसुफ अली हे फोर्ब्स बिलिनिअर्सच्या यादीत ३८८ व्या स्थानावर असून पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न हे जवळपास ३.९ बिलियन डॉलर इतके आहे. गल्फ देशांत आघाडीचे असलेले लुलू हायपरमार्केटचे ते संस्थापक आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More
post-image
News विदेश

पाकिस्तानविरोधात आता अफगाणिस्तानही सरसावला

नवी दिल्ली- काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानातून रसद आल्याचे पुढे आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संताप आहे. पाकिस्तानविरोधात असाच संताप दुसरे शेजारी इराण आणि अफगाणिस्तान...
Read More