केरळमध्ये पावसाचा हाहाकार! २६ जणांचा मृत्यू – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

केरळमध्ये पावसाचा हाहाकार! २६ जणांचा मृत्यू

तिरुवनअनंतपुरम – केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. केरळमध्ये गेल्या २४ तासांत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस आणि भूत्स्खलनामुळे जवळपास २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बचावासाठी लष्कर, नौदल, कोस्टगार्ड आणि एनडीआरफला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या ६ तुकड्या तर सैन्याच्याही एका तुकडीकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

केरळमध्ये अतिवृष्टी सुरु असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे केरळमधील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून तब्बल २४ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यासह तब्बल २६ वर्षांनंतर आशिया खंडातील सर्वात मोठे धरण असलेले इडुक्की डॅम पूर्ण भरला असून डॅममधून पाणी सोडण्यात आले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर कमरेएवढे पाणी साठले असून अनेक ठिकाणचे रस्तेच वाहून गेले आहेत. यामुळे शाळा-महाविद्यालयांनाही सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत. रेल्वे ट्रॅकलाही मोठे नुकसान झाले असून विमानसेवाही खंडित झाली आहे. जवळपास १० हजारांहून अधिक नागरिकांना मदत शिबिरामध्ये पाठविण्यात आले आहे. तर एनडीआरएफच्या तुकड्याकडून या भागांमध्ये बचाव कार्य सुरु आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More
post-image
Uncategoriz

मुंबई विमानतळावरून 24 तासांत तब्बल 1004 विमाने ये-जा झाली

मुंबई – सर्वाधिक वर्दळ असलेला विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ. स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने पुन्हा एकदा मोडीत काढला, 8 डिसेंबरला 24 तासात मुंबई विमानतळावर 1004...
Read More
post-image
News देश

आरबीआयच्या निधीचा वापर करणे ही देशविरोधी कृती

नवी दिल्ली- उर्जित पटेल आरबीआयला वाचवण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आपली कातडी वाचवण्यासाठी आरबीआयच्या राखीव निधीचा वापर करणे ही देशविरोधी कृती असल्याचे...
Read More