केनियाचा इल्फेज रूटो ठरला विजेता – ‘रन फॉर साई’साठीची मॅरेथॉन उत्साहात संपन्न – eNavakal
क्रीडा महाराष्ट्र

केनियाचा इल्फेज रूटो ठरला विजेता – ‘रन फॉर साई’साठीची मॅरेथॉन उत्साहात संपन्न

शिर्डी – साई बाबांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या ‘रन फॉन साई’ या मॅरेथॉन स्पर्धेत केनियाचे इल्फेज रूटो आणि जॉन रिप्रोझेल केनिगे यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय क्रमांक पटकाविले. ही स्पर्धा  3 किमी, 10 किमी, 21 किमी, आणि 42 किमी या गटांमध्ये पार पडली. या स्पर्धेत 14 ते 70 वयोगटाच्या स्पर्धकांनी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना सुमारे 10 लाख रूपयांचे रोख पारितोषिके देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे व पदके देण्यात आली. ही शर्यत उत्साहात संपन्न झाली.

स्पर्धेचा शुभारंभ पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते तर समारोप राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाला . शिर्डीच्या साई नगरच्या मैदानातून सकाळी 6 वाजता झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात झाली. साई नगर ते काकडी विमानतळ असा स्पर्धा मार्ग होता. या स्पर्धेत केनिया, इथोपिया व देशाच्या विविध राज्यातील 10 हजार 600 धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत माउंट एव्हरेस्ट सर केलेले ब्रिज शर्मा,  देशात अनवाणी स्पर्धेत सर्वात जलद धावणारे थॉमस बॉबी फिलीप्स यांच्यासह हजारो मान्यवरांनी  सहभाग घेतला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More