केदारनाथनंतर आज पंतप्रधान मोदी बद्रिनाथच्या चरणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

केदारनाथनंतर आज पंतप्रधान मोदी बद्रिनाथच्या चरणी

केदारनाथ (उत्तराखंड) – लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा अखेरच्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. जवळच असलेल्या गुहेत रात्रभर बसून मोदींनी ध्यानधारणा केली. आज सकाळी ७ वाजेदरम्यान मोदींनी आपली ध्यानधारणा पूर्ण केली. केदारनाथनंतर पंतप्रधान मोदी बद्रीनाथचे दर्शन घेण्यासाठी रवाना होणार आहेत. सकाळी १० वाजता बद्रीनाथ मंदिरात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पूजा केली जाणार आहे.

शनिवारी केदारनाथ मंदिरात पंतप्रधान मोदींनी पुजा केली. त्यानंतर मोदी गुहेमध्ये ध्यानसाधना करण्यासाठी गेले होते. तब्बल 18 तासांच्या ध्यानसाधनेनंतर मोदींनी माध्यमांशी प्रथम संवाद साधला आहे. ते म्हणाले की, निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली. आध्यात्मिक क्षेत्राला जाण्याची संधी मिळाली. केदारनाथच्या विकासासाठी काम सुरु असून, येथे काम करण्याची संधी कमी मिळते. देवाच्या चरणी आल्यानंतर मी त्याच्याकडे काहीच मागत नाही. केदारनाथचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे. केदारनाथचा विकास करण्याची मनापासून इच्छा होती. येथील विकासकामांवर माझे कायम लक्ष असते. असे त्यांनी म्हटले. केदारनाथ मंदिर परिसरात आल्यानंतर मोदींच्या नावाच्या जयघोष सुरू होता. पंतप्रधान मोदींनी यावेळी सर्वांची भेट घेतली. केदारनाथाचं पुन्हा एकदा दर्शन घेऊन मोदी बद्रीनाथला जाणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

नाशिकच्या मुथूट दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीला सुरतमधून अटक

नाशिक – नाशिक पोलिसांनी मुथूट दरोडा आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपाला सुरतमधून अटक केली असून जितेंद्र बहादूर सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ तीन मंत्र्यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई – ना. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा मिळाला असून त्यांच्या मंत्रिपदाला आव्हान देण्यार्‍या याचिकेवर तातडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More