केडीएमसीत 400 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप माहिती अधिकारातून प्रकार उघड – eNavakal
News महाराष्ट्र

केडीएमसीत 400 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप माहिती अधिकारातून प्रकार उघड

डोंबिवली- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ई-टेंडरिंगमध्ये फिक्सिंग होत असल्याने 400 कोटी रुपये वाढीव खर्चाचा घोटाळा समोर आला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. गेल्या 8 वर्षात केडीएमसीला जवळपास 400 कोटींचा तोटा केवळ ई-टेंडरिंगच्या फिक्सिंगमुळे सहन करावा लागला असल्याचाही आरोप मुख्यमंत्री, नगरविकास मंत्रालयासह राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रारपत्राद्वारे नगरसेवक म्हात्रे यांनी केल्यानंतर पालिकेच्या अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

केडीएमसीच्या सन 2010 ते 2018 पर्यंत ज्या निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या त्या निविदा ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने मर्जीतल्या ठरावीक ठेकेदाराला जास्त दराने देऊन ठेका मिळवून दिला आहे. यात स्वतःच्या हितासाठी पालिकेचे नुकसान सुद्धा होत आहे. तर सिंडिकेट करून पालिकेची कामे ठरावीक ठेकेदारांना वाटून देण्यात येत आहेत. एकच ठेकेदार कधी एक तर कधी तीनदा निविदा भरतो. एकच निविदा असल्यामुळे आणि तीनदा आल्यामुळे स्पर्धक नसल्यामुळे प्रशासनाला ती मंजूर करावी लागते असे भासविले जाते, असेही आरोप म्हात्रे यांनी त्यांच्या तक्रार अर्जात केले आहेत. काही रिंगमास्टर हे धंदे करत असून महापालिकेची लूटमार करत आहेत. महापालिकेत 15 टेबलवर कामाच्या फाईल फिरत असून प्रत्येक टेबलाला टक्केवारी दिली जाते. ही टक्केवारी कामाच्या 40 % असते. त्यामुळे यात पालिकेला गेल्या 8 वर्षात सुमारे 400 कोटी सहन करावा लागला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लॉकडाउन 4.0 : आता पुढे काय करणार? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली – देशात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लॉकडाउनच्या चारही टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
Read More
post-image
ट्रेंडिंग देश महाराष्ट्र

‘या’ विशाल चिखलात लपलेला जीव तुम्ही शोधू शकता का?

जगावर कोसळलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी शेकडो देश लॉकडाऊन असल्याने सध्या करोडो नागरिक आपापल्या घरातच आहेत. भारतातही मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More