केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती व महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतींची निवड – eNavakal
अन्य मुंबई

केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती व महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतींची निवड

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती व महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदी पदाची निवडणुका निवडणूक निर्णायक अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थित पार पडली .स्थायी समिती सभापती पदी भाजपाचे राहुल दामले यांची महिला तर बाल कल्याण समितीच्या सभापती पदी शिवसेनच्या दिपाली पाटील यांची बिन विरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णायक अधिकार्यांनी घोषित केले .नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती दामले व महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती दिपाली पाटील यांचे पालिकेतील सर्वच पक्षाच्या पदाधीकाऱ्यांनी व अधिकार्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या स्थायीसमिती व महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदाची निवडणुका मंगळवारी १६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता पालिकेच्या स्थायी समितीच्या दालनात निवडणूक निर्णायक अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपाचे राहुल दामले तर महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पदासाठी शिवसेनेच्या दिपाली पाटील यानी नामांकन अर्ज सादर केले होते.
या दोन्ही सभापती पदासाठी अन्य कोणत्याच पक्षांनी नामांकन अर्ज सदर न केल्याने हि निवडणुका बिन विरोध होणार असल्याचे नामांकन अर्ज सादर करण्याच्या दिवशी जाहीर झाले होते. मात्र औपचारिक घोषणा करण्याची बाकी होते. मंगळवारी दुपारी निवडणूक निर्णयक अधिकारी यांनी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली या पदाच्या निवडणुकी साठी शिवसेनेच्या दिपाली पाटील यांच्या व्यतिरिक्त अन्य दुसर्या कोणत्याच पक्षाने उमेदवारी अर्ज न भरल्याने शिवसेनेच्या दिपाली पाटील यांची महिला व बाल कल्याण सामितीच्या सभापदी पदी बिन विरोध झाल्याचे घोषित केले तर या निवडणुकी नंतर स्थायी समितीच्या सभापती पदासाठीची निवडणूक घेण्यात आली . स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपाचे राहुल दामले यांचा एकमेव नामांकन अर्ज आल्याने राहुल दामले यांची स्थायी समिती सभापती पदी बिन विरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णयक अधिकारी यांनी घोषित केले . स्थायी समिती सभापतीपदी तर महिला व बाल कल्याण सामितीच्या सभापदी पदी भाजपा शिवसेना युतीची पालिकेवर सत्ता आली आहे.
नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती दामले व महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती दिपाली पाटील यांचे पालिकेतील सर्वच पक्षाच्या पदाधीक्र्यांनी व अधिकार्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .भाजपाचे राहुल दामले याना स्थायी सामीचे २३ वे सभापती तर भाजपाचे पाचवे सभापती बनण्याचा मान मिळाला आहे .भाजपाचे अभ्यासू माजी स्थायी सभापती स्व. नगरसेवक नंदू जोशी नंतर भाजपाचे अभ्यासू नगरसेवक म्हणून राहुल दामले यांच्या कडे पाहिजे जात आहे .२०००-२००१ साली पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भाजपाचे अभ्यासू नगरसेवक स्व. नगरसेवक नंदू जोशी यांची भाजपाचे पहिले स्थायी समिती सभापती म्हणून निवड झाली होती त्यानंतर २००२-२००३ साली श्रीकर चौधरी ,२००७-२००८ साली रवींद्र चव्हाण , २०१६-२०१७ साली संदीप गायकर यांची तर झाली होती त्या नंतर यंदाच्या वर्षी २०१८ -२०१९  साला करीता राहुल दामले हे भाजपा कडून निवड करण्यात आलेले पाचवे स्थायी समिती सभापती बनण्याचा मान मिळाला आहे .
राहुल दामले यांची घौडदौड  सुरूच 
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत भाजपाने राहुल दामले यांना स्वीकृत नगरसेवकपदी पहिली संधी दिली त्यानंतर त्याना पालिकेच्या निवडणुकी रिंगणात उतरवून नगरसेवका पदी निवडून आल्यावर त्यांच्या वर भाजपा गट नेता,पालिकेच्या उप महापौर पदी निवड करण्यात आल्यावर स्थायी समितीच्या सदस्यपदी त्यांची वर्णी लावली होती यंदा त्याना स्थायी समिती सभापती पदाची माळ त्यांच्या गळ्यात पक्षाने टाकल्याने राहुल दामले यांच्या अभ्यासू वृतीला पक्षाने न्याय दिला आहे .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर

मुंबई – राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे –...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

देशभरात 4,281 कोरोनाग्रस्त! राज्यात ८६८ रुग्ण

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: साडेपाच लाख बेघर मजुरांना अन्नवाटप- मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४६५३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ४,५४,१४२ स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: राज्यात कोरोनाचे ८६८ रुग्ण, मुंबई डेंजर झोनमध्येच!

मुंबई – देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. गेल्या २४ तासांत १२० नवे रुग्ण सापडले असून आता कोरोनाबाधितांची...
Read More
post-image
देश

जात, धर्म विसरून साऱ्यांनी एकत्र येऊया- राहुल गांधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत हा सगळा भेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे असं...
Read More