केजरीवाल, ममतांची दिल्लीत 13 फेब्रुवारीला रॅली – eNavakal
News देश

केजरीवाल, ममतांची दिल्लीत 13 फेब्रुवारीला रॅली

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू 13 फेब्रुवारीला दिल्लीतील जंतर मंतर येथे रॅली आयोजित करणार आहेत. दिल्ली, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ असे नाव रॅलीला दिले आहे. भाजपविरोधी पक्षांतील काही इतर नेतेही रॅलीत सहभागी होणार असल्याचे आम आदमी पक्षातर्फे सांगण्यात आले.
भारतात राजकीय दृष्टीने सध्या निर्णायक स्थिती आहे. मोदी-शाह जोडगोळीने संविधान आणि लोकशाही संपवण्याचा घाट घातला आहे. संविधान आणि लोकशाहीसाठी देशातील हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणार्पण केले आहे. ते वाचवण्यासाठी उभे राहणे हे आज प्रत्येक देशप्रेमी भारतीयाचे कर्तव्य आहे. यासाठी केजरीवाल, ममता, नायडू एकत्र आले आहेत, असे आप नेते गोपाळ राय यांनी सांगितले.
13 फेब्रुवारीला ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ रॅलीला तीनही राज्यांचे मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत. भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांना नरेंद्र मोदी व अमित शाह भेटी देत आहेत. तसेच तेथील जनतेला भाजपकडे आकृष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इतर भाजप नेतेही तेच करत आहेत. यामुळे देशाच्या संघराज्याच्या संरचनेचा उपहास केला जात आहे. मोदी सरकारने केंद्रीय संस्थांचा धूर्तपणे गैरवापर करून राजकीय विरोधकांची गळचेपी केली आहे. नियम आणि कायद्यांचा अनादर करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने पार केल्या आहेत, असेही राय यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More