केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लस वितरण – आरोग्यमंत्री राजेश टोपे – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लस वितरण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लस पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून आता 358 केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक केंद्र मुंबईत (50) असून त्यापाठोपाठ पुणे (39) ठाणे (29) या शहरांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुंबईसाठी 1 लाख 39 हजार 500 तर पुण्यासाठी 1 लाख 13 हजार डोस वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात सुमारे 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. राज्यातील 358 केंद्रांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी सुमारे 35 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल. 16 जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार असून जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतील कूपर रुग्णालय या दोन ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री संवाद साधतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला कोरोना लशींचे वाटप केले जात असून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात 9 लाख 63 हजार लशींचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात 9 हजार डोस, अमरावतीसाठी 17 हजार, औरंगाबाद-34 हजार, बीड-18 हजार, बुलढाणा-19 हजार, धुळे-12 हजार 500, गडचिरोली 12 हजार, गोंदिया 10 हजार, हिंगाली 6 हजार 500, जळगाव-24 हजार 500, लातूर-21 हजार, नागपूर-42 हजार, नांदेड-17 हजार, नंदुरबार-12 हजार 500, नाशिक-43 हजार 500, मुंबई-1 लाख 39 हजार 500, उस्मानाबाद-10 हजार, परभणी-9 हजार 500, पुणे-1 लाख 13 हजार, रत्नागिरी-16 हजार, सांगली-32 हजार, सातारा-30 हजार, सिंधुदुर्ग-10 हजार 500, सोलापूर-34 हजार, वर्धा-20 हजार 500, यवतमाळ-18 हजार 500, अहमदनगर-39 हजार, भंडारा-9 हजार 500, चंद्रपूर-20 हजार, जालना-14 हजार 500, कोल्हापूर-37 हजार 500, पालघर-19 हजार 500, रायगड-9 हजार 500, ठाणे-74 हजार, वाशिम-6 हजार 500 अशा प्रकारे वाटप करण्यात आले आहे.

सुधारित लसीकरण केंद्रांची संख्या अशी :

हमदनगर-15, अकोला-4, अमरावती-6, औरंगाबाद-13, बीड-6, भंडारा-4, बुलढाणा-7, चंद्रपूर-8, धुळे-5, गडचिरोली-5, गोंदिया-4, हिंगोली-3, जळगाव-9, जालना-6, कोल्हापूर-14, लातूर-8, मुंबई-50, नागपूर-15, नांदेड-6, नंदुरबार-5, नाशिक-16, उस्मानाबाद-4, पालघर-6, परभणी-4, पुणे-39, रायगड-5, रत्नागिरी-6, सांगली-12, सातारा-11, सिंधुदुर्ग-4, सोलापूर-13, ठाणे-29, वर्धा-8, वाशिम-4, यवतमाळ-6 असे एकूण 358 केंद्र करण्यात आली आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

विशेष विवाह कायद्यात ३० दिवसांच्या पूर्व नोटीसीची गरज नाही, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

अलाहाबाद  – विशेष विवाह कायद्यामध्ये अलाहाबाद हायकोर्टाने सर्वात मोठी सुधारणा केली आहे. कोर्टाने यासंदर्भात आदेश देताना विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न करणाऱ्या दाम्पत्याला ३० दिवसांच्या पूर्व...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लस वितरण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लस पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

सोनू सूदच्या अवैध बांधकामप्रकरणी हायकोर्टानं राखून ठेवला निकाल

मुंबई – अभिनेता सोनू सुदला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. अवैध बांधकामप्रकरणी त्याला नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे त्याने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली...
Read More
post-image
महाराष्ट्र

सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी उमराणे व खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द

मुंबई – नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोरोनाबाधित मतदारांसाठी निवडणूक आयोगानं आणली नवी सुविधा

मुंबई – कोरोनाबाधित रुग्णांना ग्रामपंचयात निवडणुकीत मतदान करता येणार का? हा प्रश्न सर्वांसमोर होता. राज्य निवडणूक आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. कोरोनाबाधित आणि विलगीकरण...
Read More