केंद्रीय हवाई परिवहन सुरेश प्रभू रविवारी सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौऱ्यावर – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

केंद्रीय हवाई परिवहन सुरेश प्रभू रविवारी सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौऱ्यावर

मुंबई –  केंद्रीय हवाई परिवहन ,वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू हे  १ एप्रिल रोजी रविवारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून गेली काही वर्षे रखडलेल्या रत्नागिरी व चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत.तसेच रत्नागिरी येथे राऊंड टेबल कॉन्फरन्सचे आयोजन केले असून त्यामुळे कोकणाचा पर्यटन व औद्योगिक विकास व दळणवळणाचे साधन म्हणून महत्वाची समजली जाणारी  विमानसेवा लवकर मार्गी लागेल अशी आशा कोकणी माणसाला वाटू लागली आहे.रेल्वेनंतर विमान सेवा सुरु झाली तर कोकणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
  प्रभू हे रविवारी प्रथम रत्नागिरीत येत आहेत.येथे ते रत्नागिरी विमानतळाची पाहणी करणार आहेत.त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण विकासासंदर्भांत अधिकाऱ्यांशी बैठक घेतील.नंतर ओ.पी.मुंजाळ फाऊंडेशन आयोजित महिला सबलीकरणाचा कार्यक्रम अंबर हॉल,रत्नागिरी येथे उपस्थित राहून तो कार्यक्रम आटोपून ते सिंधुदुर्गात हेलिकॉप्टरने जातील.नंतर कुडाळ येथेओ.पि.मुंजाळ फाऊंडेशन आयोजित महिला सबलीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर नंतर पत्रकार परिषद व त्यांनतर गेली २० वर्षे रखडलेल्या चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत
  प्रभू हे रेल्वेमंत्री असताना त्यांनी अनेक रेल्वे प्रकल्प मंजूर केले असून त्यामुळे कोकण विकासात भर पडणार आहे.ते सध्या उद्योग,वाणिज्य आणि सुदैवाने ते सध्या हवाई परिवहवन मंत्री म्हणून काम पहात आहेत.त्यामुळे सिंधुदुर्गातील चिपी व रत्नागिरीतील विमान तळाच्या विकासाला चालना मिळणार आहे.प्रभू यांचा दौरा कोकणच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात असून कोकणी माणसाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More