केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली – मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी भेट आहे. चालू आर्थिक वर्षाच्या १ जुलैपासून हा निर्णय लागू करण्यात येणार, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे ५० लाख वेतनधारक कर्मचारी आणि ६२ पेन्शनधारकांना लाभ होणार आहे. मात्र यामुळे सरकारी तिजोरीवरील ताण वाढणार असून १६ हजार कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची चांगली भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला आज मंजुरी दिली. प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला. गेल्या वर्षभरामध्ये या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

महाराष्ट्रात आज 6 हजार 555 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 6 हजार 555 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे – काल आणि आज मुंबईसह उपनगर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यानंतर आता कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण

शालेय शिक्षण विभागाकडून जिओ टीव्हीवरील तीन चॅनेलचे उद्घाटन

मुंबई – लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर जिओ टीव्ही प्लॅटफॉर्मवर इयत्ता बारावी विज्ञान शाखा,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

ऐका हो ऐका…’माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत जुनी शनाया परतणार

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका लॉकडाऊननंतर आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे. नव्या भागांसह प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

गाझियाबाद – उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात एका मेणबत्तीच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४ जण गंभीर जखमी झाले...
Read More