केंद्रीय कर्मचार्‍यांना घरासाठी 25 लाख मिळणार – eNavakal
News देश

केंद्रीय कर्मचार्‍यांना घरासाठी 25 लाख मिळणार

नवी दिल्ली  – केंद्र सरकारच्या गृहनिर्माण अग्रिम योजनेंतर्गत कर्मचार्‍यांना आता नवीन घर बांधणे किंवा खरेदी करण्यासाठी 8.50 टक्के व्याजदराने 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. याआधी त्याची मर्यादा साडेसात लाख रुपये होती. तर व्याजाचा दर 6 ते 9.50 टक्क्यांपर्यंत होता.
20 वर्षांसाठी 25 लाख रुपये कर्ज देणार्‍या अन्य वित्त कंपन्या अथवा खासगी बँकांच्या तुलनेत गृहनिर्माण अग्रिम योजनेचा लाभ घेऊन जवळपास 11 लाख रुपयांची बचत करू शकतात, असे नगरविकास मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. एसबीआयसारख्या बँकांतून 20 वर्षांसाठी 8.35 टक्के व्याजदराने 25 लाख रुपये कर्ज घेतल्यास त्यावर 21, 459 रुपये मासिक हप्ता भरावा लागेल. 20 वर्षांपर्यंत ही रक्कम 51.50 लाख होते. पण हेच कर्ज केंद्र सरकारच्या योजनेतून 20 वर्षांसाठी घेतल्यास सुरुवातीचे 15 वर्षे मासिक हप्ता 13890 रुपये आणि त्यानंतर 26411 रुपये मासिक हप्ता भरावा लागणार आहे. 20 वर्षांपर्यंत ही रक्कम 40 लाख 84 हजार रुपये होते. त्यामुळे 11 लाख रुपयांची बचत होते, असेही त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More
post-image
News देश

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात! चित्रपटासाठी गीत लिहिले नाही! जावेद अख्तर

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या चित्रपटात नरेंद्र...
Read More