केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही! मदत मागितली तर बिघडलं कुठं? – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही! मदत मागितली तर बिघडलं कुठं?

सोलापूर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीग्रस्त सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘राज्यात अतिवृष्टी झाली असताना राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर बिघडलं कुठं?’, असा सवाल उपस्थित केला. तसेच ‘केंद्रातील सरकार हे देशाचे सरकार आहे. परदेशातील सरकार नाही’, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोन करुन मदतीचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. ते देशाचं सरकार आहे. विरोधक केवळ पक्षाचा विचार करत असतील. त्यांनी पक्षपात न करता मदत करणं अवश्यक आहे. राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये. केंद्र काय करणार आणि राज्य काय करणार यापेक्षा राज्याला केंद्राच्या मदतीची गरज असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी केली पाहिजे.’ तसेच आजच मला परिस्थिती कळली असं नाही. पावसाला सुरुवात झाल्यापासून यंत्रणेच्या संपर्कात आहे. नुकसान किती होतंय, पाऊस किती पडतोय याची माहिती सातत्याने घेत होतो. उद्या परवाही मी येणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाचे म्हणजे ‘पाऊस अजूनही पडतोय. धोक्याचा इशारा दिला आहे. संकट टळलेलं नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे लोकांनी गाफील राहू नये. सर्वप्रथम स्वत:ला सुरक्षित ठेवावे, हा परतीचा पाऊस जाता जाता किती फटका देईल याचा अंदाज आला आहे. सर्व आढावा घेऊन प्रत्यक्ष मदत करणार आहोत. तूर्तास जे लोक दगावले त्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य द्यायला सुरुवात केली आहे’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर ‘घाबरु नका, सावध राहा. मी घोषणा केली नाही हे करू ते करू, अंदाज घेऊ, माहिती घेऊ आणि जे करायचं ते करु. पंचनामे सुरू आहेत, त्यानंतर प्रत्यक्ष मदत करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही! मदत मागितली तर बिघडलं कुठं?

सोलापूर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीग्रस्त सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘राज्यात अतिवृष्टी झाली असताना राज्य सरकारने केंद्राकडे मदत...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करताना विजेच्या धक्क्याने २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबई – मुंबईत पाईपलाईनचे काम सुरू असताना वीजेचा धक्का लागून पालिकेच्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून ५ कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही!

सोलापूर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ‘हे सरकार शेतकऱ्यांचं आणि जनतेचं आहे. त्यामुळे सरकार तुम्हाला नाराज करणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा; नासलेली पिकं घेऊन शेतकरी भेटले

मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. गेल्या आठ दिवसांत झालेल्या पावसामुळे कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे...
Read More