कॅलेंडर्सची होळी करत नाणारवासीयांचे अनोखे आंदोलन – eNavakal
महाराष्ट्र

कॅलेंडर्सची होळी करत नाणारवासीयांचे अनोखे आंदोलन

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आज पुन्हा एकदा नाणारमधील ग्रामस्थांनी एकत्र येत अनोखे आंदोलन केले. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (आरआरपीसीएल) कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या कॅलेंडर्सची होळी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा पहिल्यापासून विरोध आहे. त्यामुळे गेली दोन वर्ष राजापूरमधील वातावरण आंदोलन, मोर्चे, सभांच्या माध्यमातून तापलेलं आहे. याचे राजकीय पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. त्यामुळे राज्यासह देश पातळीवर हा नाणार प्रकल्पाचा मुद्दा धगधगत आहे. तर दुसरीकडे सरकरकडून हा प्रकल्प रेटण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडकडून (आरआरपीसीएल) जनतेच्या प्रबोधनाचं प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांना पोस्टाद्वारे कॅलेंडर्स पाठविण्यात आली आहेत. या कॅलेंडर्समधून हा प्रकल्प कसा असेल याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या राजापूर तालुक्यातील 14 गावांमध्ये कॅलेंडर्स पाठविण्यात आली आहेत. आणि विशेष म्हणजे मतदार यादीनुसार ही कॅलेंडर्स पाठवली आहेत. त्यामध्ये मतदान क्रमांक, मतदान केंद्र याचा उल्लेख कॅलेंडर्स पाठविण्यात आलेल्या पत्त्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा उद्रेक झाला असून आज त्याचे पडसाद नाणार गावात उमटले. नाणार गावातील शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत या कॅलेंडर्सची होळी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More