कॅलिफोर्नियात वणवा! हजारो नागरिकांचे स्थलांतर – eNavakal
News विदेश

कॅलिफोर्नियात वणवा! हजारो नागरिकांचे स्थलांतर

कॅलिफोर्निया – अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भयानक वणवा पेटला आहे. त्याचे अतिशय धोकादायक परिणाम आता दिसू लागले आहेत. सँटा बारबेरा या शहरात अक्षरशः राखेचा पाऊस पडतोय. त्यामुळे हजारो लोकांनी इतर राज्यांमध्ये तात्पुरते स्थलांतर केले आहे.
या वणव्यामुळे राज्यातील अनेक भागांवर दाट धुराची चादर निर्माण झाली आहे. यामुळे लाखो नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय. आगीमुळे 930 चौरस किलोमीटरचे जंगल खाक झाले आहे.
मागील दहा दिवसांपासून हा वणवा पेटतोय. पण सोसाट्याच्या वार्‍यामुळे आग आणखी भडकत चालली आहे. हजारो अग्निशमन अधिकारी आणि कर्मचारी ही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आग लागलेल भूभाग इतका मोठा आहे की, अग्निशमन यंत्रणा तोकडी पडत आहे.
दरम्यान या आगीसंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या वणव्यातील जंगलात सशाचे एक छोटेसे पिल्लू अडकले होते. त्याला वाचविण्यासाठी एक तरुण जीवाची पर्वा न करता बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे तो त्यात यशस्वीही होतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राम मंदिराबाबत बोलणाऱ्यांनो सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवा – पंतप्रधान मोदी

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More