कॅम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरण  – eNavakal
गुरुवार विशेष

कॅम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरण 

प्रतिज्ञा पवार-शेटे
काय आहे  कॅम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरण ?

कॅम्ब्रिज अॅनालिटिका ही एक ब्रिटिश कंपनी असून ही कंपनी राजकीय सल्ला देणारी आणि त्यासाठी उपलब्ध सर्व माहितीची छाननी करून त्यानुसार निवडणूक प्रचाराची दिशा ठरवण्यास मदत करते. या कंपनीचा रॉबर्ट मर्सर हा सहमालक असून त्याचे अनेक राजकीय पक्षांशी लागेबांधे आहेत.  कॅम्ब्रिज अॅनालिटिकाची कार्यालये लंडन,न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन येथे आहेत.

कॅम्ब्रिज अॅनालिटिकाचा वादग्रस्त सीईओ अलेक्झांडर निक्स याने २०१४ पासून अमेरिकन राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली होती. ट्रेड क्रूज या अमेरिकन राजकारण्याच्या निवडणूक प्रचारासाठी २०१६मध्ये उपलब्ध माहितीचे  विश्लेषण करत याचा उपयोग निवडणूक प्रचारात केला. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणूक प्रचारासाठी हीच पद्धत अवलंबण्यात आली. त्यामुळे लागलेले निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित होते.

त्यानंतर २०१६ च्या जुलै महिन्यात ट्रम्प यांनी या कंपनीला १ लाख डॉलर्स, ऑगस्ट महिन्यात २.५ लाख डॉलर्स आणि सप्टेंबर महिन्यात ५ लाख डॉलर्स उचलून दिल्याचे आढळले.

कॅम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली हे जगजाहीर आहेच. त्याचबरोबर अलेक्झांडर निक्सच्या नकळत त्याच्या एका लीक झालेल्या व्हिडिओमध्ये त्याने कॅम्ब्रिज अॅनालिटिका ही कंपनी जगभरातील २०० निवडणुकांवर प्रभाव पाडण्यासाठी हनी ट्रॅप,लाच देणे,वेश्या पुरवणे अशा बेकायदेशीर गोष्टींचा आधार घेतल्याचे कबुल केले आहे. या व्हिडिओच्या आधारावर त्याला २० मार्च २०१८ रोजी कंपनीतून निलंबित करण्यात आले.

 
कॅम्ब्रिज अॅनालिटिकावर लावण्यात आलेले आरोप 
  ब्रिटनमधील कॅम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मदत केली . 2017 सालच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या ‘कॅम्ब्रिज अॅनालिटिका’ या कंपनीने,जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती त्यांच्या परवानगीशिवाय चोरली, असा आरोप करण्यात आला. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला गेला, असाही आरोप करण्यात आला आहे.  कॅम्ब्रिज अॅनालिटिकाचे माजी कॉन्ट्रॅक्टर ख्रिस्तोफर विली यांनी ही माहिती दिली असून विली हे फेसबुकवरून मिळणाऱ्या माहितीच्या उपयोगासंबंधी माहितीचे वर्गीकरण करत असत.
काय आहे  ब्रेक्सिट लिंक प्रकरण?
ब्रेक्सिट सार्वमताच्या दरम्यान  कॅम्ब्रिज अॅनालिटिकाची सहकारी कंपनी असलेल्या कंपनीला ६,२५,००० डॉलरचे पेमेंट मिळाले होते.  युरोपीय महासंघात राहायचे किंवा नाही, यासंबंधी नागरिकांचे मत आजमाविण्यासाठी सार्वमत घेण्यात आले होते. मात्र याबाबतच्या प्रचारात देखील कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने ढवळाढवळ केल्याचे उघड झाले आहे.

 

असा करण्यात आला फेसबुकचा वापर 

फेसबुकला त्याच्या अप्लिकेशनमधील लोकांच्या वैयक्तीक माहितीच्या सुरक्षेसाबाबत याआधी अनेकदा चेतावणी देण्यात आली होती. तसेच कॅम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीकडून अनेकदा नियमांचे उल्लंघन होत असते अशी माहिती फेसबुकला २०१५ पासूनच होती. तसेच फेसबुकच्या एका माजी मॅनेजरने फेसबुकवरील वैयक्तिक माहिती असलेला डेटा खासगी कंपन्यांकडून वापरला जात असल्याबद्दल सांगितले होते. रविवारी फेसबुकने इंग्लंड आणि अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये माफीनामा दिला. तसेच या माहितीचा वापर इतर कंपन्या करत तर नाहीत ना? हे पडताळात असल्याचे नमूद केले.

या प्रकारानंतरच्या प्रतिक्रिया
मार्च २०१८ मध्ये अनेक वर्तमानपत्रांनी  कॅम्ब्रिज अॅनालिटिका करत असलेल्या गैरप्रकाराबाबत बातम्या द्यायला सुरुवात केली.अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध वृत्तपत्राने याबाबत बातमी दिल्यानंतर लगेचच एका वृत्त वाहिनीने अलेक्झांडर निक्सच्या ऑफिसमध्ये स्टिंग ऑपरेशन करत इतर खळबळजनक खुलासे केले.या सर्व बातम्यांनंतर इंग्लंडच्या माहिती तंत्रज्ञान  आयुक्तांनी या कंपनीचे सर्व सर्वर तपासण्याचे आदेश दिले. तसेच फेसबुकने  कॅम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीला फेसबुकवर जाहिराती देण्याला बंदी घातली. २३ मार्चला ब्रिटिश हायकोर्टने  माहिती तंत्रज्ञान आयुक्तांना  कॅम्ब्रिज अॅनालिटिकाच्या लंडनमधील ऑफिसची झडती घेण्यासाठीचे वॉरंट सुपूर्त केले.
ब्रिटन आणि अमेरिकेच्या सर्व राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये फुलपेज जाहिरात देऊन मार्क झुकरबर्गने माफी मागितली. या माफीनाम्यामध्ये मार्क ने म्हटले की, आपली माहिती गोपनीय व सुरक्षित ठेवायची आमची जबाबदारी आहे. जर आम्ही यासाठी सक्षम नसेल तर आम्ही यासाठी योग्य नाही असेही मार्कने नमूद केले.
फेसबुकला याप्रकरणाचा बसलेला फटका
या काळात गमावलेला युजर्सचा विश्वास फेसबुकला अद्याप संपन्न करता आलेला नाही. याचा परिणाम फेसबुक युजर्सच्या संख्येवर होताना दिसत आहे. त्यामुळे  लाखो लोकांनी फेसबुकला रामराम ठोकला आहे. चौथ्या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली आहे.सोमवारी फेसबुकच्या संपत्तीत 37 अब्ज डॉलरची घट झाली. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनाही 6.6 अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागले आहे. अमेरिका आणि युरोपमधल्या काही देशांत फेसबुकची चौकशीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉट्स‍अॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विट करून फेसबुक डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. ‘ही योग्य वेळ असून फेसबुक डिलीट करा’,असे ट्विट ब्रायन अॅक्टन यांनी केले. केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांनी ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ या कंपन्याचे फेसबुकवरील पेज बंद केले.
 
भारत सरकारची याबाबत भूमिका 
  फेसबुक युजर्स डेटा लीकप्रकरणी केंद्र सरकारने शुक्रवारी केंब्रिज अॅनालिटिकाला नोटीस पाठवली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती  तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ही नोटीस जारी करण्यात आली आहे. याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं या नोटीसद्वारे 31 मार्चपर्यंत 6 प्रश्नांची उत्तर द्यायला सांगितले आहे. केंद्र सरकारने ‘केंब्रिज अॅनालिटिका’ला नोटीस पाठवून भारतीयांच्या माहितीचा वापर करण्यामध्ये कंपनीचा स्वतःचा सहभाग आहे का?, भारतीयांची माहिती त्यांनी कशा प्रकारे मिळवली?, कंपनीच्या माध्यमांतून सोशल मीडियाद्वारे भारतीयांची माहिती मिळवणाऱ्या दुसऱ्या कंपन्या कोणत्या आहेत?, भारतीयांची माहिती मिळवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेतली होती का?, या माहितीपर्यंत कंपनी कशी पोहोचली?, या मिळवलेल्या माहितीच्या आधारे काही नवी प्रोफाईल्स तयार करण्यात आली आहेत का? प्रश्न विचारले आहेत.
या सगळ्या प्रकारानंतर आपण फेसबुकवर लाईक करत असलेली पेजेस,शेअर करत असलेली माहिती या सर्वांच्या आधारे आपले व्यक्तिमत्व जोखले जाऊ शकते आणि कुणीतरी यावर कायम लक्ष ठेऊन आहे हे धक्कादायक आहे. काही मोजके प्रश्न विचारून त्यांच्या उत्तरावरून समोरील व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असेल हे पाहण्याची प्रणाली मायकल कोसिन्स्की या मनोवैज्ञानिकाने१९८० मध्ये सर्वात आधी वापरली. यावरून माणसाच्या सवयीननुसार मानवी मनाच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास केला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. मात्र यातून मानसोपचार करण्यास मदत व्हावी हा त्यांचा हेतू होता. या पद्धतीचा अवलंब करून लोकशाहीचा कणा असलेल्या निवडणुकांमध्ये इतक्या धोकादायक पद्धतीने होणे मायकल कोसिन्स्की यांना नक्कीच अपेक्षित नव्हते. त्यामुळे आता भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये असा प्रकार घडला तर… आपण असल्याप्रकारांचे बळी ठरू नये म्हणून आपणच आपल्या वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्याच्या सवयीवर अंकुश ठेवायला हवा.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको

जयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम

नवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...
Read More