मुंबई- अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सरचे निदान झाल्यामुळे बॉलिवूडमधील अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. नुकतीच अभिनेते अनुपम खेर यांनी न्यूयॉर्कमध्ये जाऊन तिची भेट घेतली. कॅन्सरला देत असलेली झुंज पाहून ‘ती माझी हिरो आहे’ असे ट्विटही अनुपम खेर यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वीच खेर अमेरिकेत गेले होते. न्यूयॉर्कमध्ये जाऊन त्यांनी सोनाली बेंद्रेची भेट घेतली. त्यांनी 15 दिवस न्यूयॉर्कमध्ये राहून सोनाली कॅन्सरशी देत असलेला लढा पाहिला. त्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये खेर म्हणतात की, मी आणि सोनालीने काही चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. मुंबईत अनेकदा आमच्या भेटीगाठी व्हायच्या. सोनाली ही एक अत्यंत सह्र्दय व्यक्ती आहे. पण गेल्या 15 दिवसांत आमच्या झालेल्या भेटीवरून मी हे निश्चितच म्हणू शकतो की सोनाली माझ्यासाठी हिरोच आहे.