‘कॅनडा नागरिक’ अक्षय कुमारचा फोर्ब्स यादीत समावेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘कॅनडा नागरिक’ अक्षय कुमारचा फोर्ब्स यादीत समावेश

नवी दिल्ली – ‘फोर्ब्स’ मासिकाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील सेलिब्रिटींची यादी नुकतीच जाहीर केली आहे. कॅनडाचा नागरिक असलेला बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने या यादीत स्थान मिळविले आहे. या यादीत तो ३३व्या क्रमांकावर असून २०१८ ते २०१९ या एक वर्षात त्याने तब्बल ४४४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईने बॉलिवूड कलाकारांनाच नाही तर रिहाना, जॅकी चैन, स्कारलेट जॉनसन यांसारख्या हॉलिवूड कलाकारांनाही त्याने मागे टाकले आहे. तर २०१६ पासून या यादीत अव्वल ठरणारी अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट ही यंदाही प्रथम क्रमांकावर आहे. त्याची गेल्या वर्षीची कमाई १८५ मिलियन (१२६३ कोटी) इतकी होती.

टेलर स्विफ्टनंतर, मॉडेल काइली जेनर १७० मिलियन डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकन रॅपर कनय वेस्ट तिसऱ्या क्रमांकावर, अर्जेंटीनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी चौथ्या तर ब्रिटिश गायक एड शीरन पाचव्या क्रमांकावर आहे.

अक्षय कुमारने या वर्षात चार सुपरहिट चित्रपट केल्याने कमाईच्या आकड्यामध्ये तो वरचढ ठरला आहे. शिवाय जाहिरात क्षेत्रातही तो सध्या आघाडीवर आहे. तसेच आगामी काळात त्याचे ‘मिशन मंगल’, ‘हाऊसफुल ४’, ‘गुड न्यूज’, ‘सुर्यवंशी’ हे चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

पहिल्या १० सेलिब्रिटींची कमाई

१. टेलर स्विफ्ट (अमेरिकन गायिका)
कमाई – १२६३ कोटी

२. कायली जेनर (महिला उद्योजक, अमेरिका)
कमाई – ११६१ कोटी

३. कनय वेस्ट (संगीतकार, अमेरिका)
कमाई – १०२४ कोटी

४. लिओनेल मेस्सी (फुटबॉलपटू, आर्जेटिना)
कमाई – ८६७ कोटी

५. एड शीरन (संगीतकार, ब्रिटन)
कमाई – ७५१ कोटी

६. ख्रिस्तियानो रोनाल्डो (फुटबॉलपटू, पोर्तुगाल)
कमाई – ७४४ कोटी

७. नेमार (फुटबॉलपटू, ब्राझील)
कमाई – ७१७ कोटी

८. द ईगल्स (संगीतकारांचा गट, अमेरिका)
कमाई – ६८३ कोटी

९. डॉ. फिल मॅक्रगा (टीव्ही सेलिब्रिटी, अमेरिका)
कमाई – ६४९ कोटी

१०. कनेलो अलव्हरेज (मुष्टीयोद्धा)
कमाई – ६४२ कोटी

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More