कॅॅनडा – कॅॅनडातील सर्वात मोठ्या तेल रिफायनरीत सोमवारी सकाळी स्फोट झाला. तेल रिफायनरीच्या सेंट जॉन रिफायनरी प्लांटमध्ये ही घटना घडली. ७८ एकर औद्योगिक परिसरात ३००० कर्मचारी कामावर आहेत. त्यावेळी काम बंद असल्याने बरेच कर्मचारी हे बाहेर होते. दरम्यान ५ कर्मचारी जखमी झाले, त्यांना सेंट जॉनच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कंपनीतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, रिफायनरीच्या डिझेल ट्रीटिंग युनिटमध्ये हा स्फोट झाला. डीझेल फ्युएल मधून सल्फर काढल्याने हा अपघात झाला. घटनादर्शींनी सांगितले की, परिसरातील सर्वांना सकाळी १० च्या सुमारास सावध करण्यात आले आणि त्यांना तेथून जाण्यास सांगितले. आयर्व्हिंग ऑईलने ट्विटरवर सांगितले की, कंपनीचे सर्व कर्मचारी हे सुरक्षित आहेत.