कतरिनाला आरती करता येत नाही का? नेटकरी संतापले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

कतरिनाला आरती करता येत नाही का? नेटकरी संतापले

मुंबई – दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी अभिनेता सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान हिच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. नेहमीप्रमाणेच सलमानचे सर्व कुटुंब आणि जवळची मैत्रीण कतरिना कैफ यावेळी उपस्थित होती. प्रत्येकाने बाप्पाची मनोभावे पूजा केली. परंतु यावेळी कतरिनाकडून  एक चूक झाली आहे. आरतीचे ताट उलट दिशेने फिरवताना ती दिसत आहे. अर्थात, ही चूक ट्रोलर्सच्या लगेच लक्षात आली आणि नेटकर्यांनी अक्षरशः ट्रोलिंग सुरु केले. थोडक्यात काय तर यावेळी मात्र कतरिना चांगलीच कचाट्यात सापडली आहे.

कतरिनाच्या या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात असे एकाने म्हटले आहे. तर आरती करण्यापूर्वी एकदा विचारायला हवे होते असा सल्ला एकाने दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानने ट्रोलर्सना चांगलेच खडसावले होते. १०० ते २०० फॉलोअर्स असणारे ट्रोलर्स कसले असे त्याने म्हटले होते. आणि आता तर ट्रोलर्सने चक्क त्याच्या जवळच्या व्यक्तीलाच निशाण्यावर धरले आहे म्हणल्यावर सलमानचा पारा चढला असणार यात शंका नाही. आता यावेळी सलमान काय प्रतिक्रिया देतो हे लवकरच कळेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More