कृष्णकुमार बनला चॅम्पियन, जनसुराज्य शक्ती श्री’च्या किताबावर नाव कोरले – eNavakal
क्रीडा महाराष्ट्र

कृष्णकुमार बनला चॅम्पियन, जनसुराज्य शक्ती श्री’च्या किताबावर नाव कोरले

 

वारणानगर- सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या 23 व्या पुण्यस्मरणनिमित्त वारणानगर (ता. पन्हाळा) येथे आयोजित केलेल्या ‘वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम’ मैदानात प्रथम क्रमांकाच्या ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबासाठी हिंदकेसरी पिद्दी आखाडाचे जास्सा पट्टी व हिंदकेसरी कृष्णकुमार (सोनपत) यांच्यात लढत झाली. या चुरशीच्या किताबी लढतीत कृष्णकुमारने गुणाधिक्यावर विजय मिळवित ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबाला गवसणी घातली.  या किताबी लढतीत कृष्णकुमारने सुरुवातीला ताबा घेण्याचा प्रयत्न केला; पण तो असफल ठरला. जास्सा पट्टी हा घिस्सा डाव टाकण्याचा प्रयत्न करीत होता. दोघेही एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत होते. अंत्यत अटीतटीच्या लढतीत जास्सा पट्टी हा कृष्णकुमारच्या पकडीतून दोन वेळा निसटला. पंचवीस मिनिटानंतर पंचांनी ही कुस्ती गुणावर करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या कृष्णकुमारने वर्चस्व गाजवून ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबावर आपले नाव कोरले. दुसर्‍या क्रमांकासाठी वारणा साखर किताबासाठी झालेल्या लढतीत पंजाबचा भारत केसरी साबा व हिंदकेसरी जोगिंदरसिंग यांच्यात लढत झाली. दोघेही वेगवेगळे डाव खेळत होते. सुरुवातीला साबाने जोगिंदरवर ताबा घेतला होता; पण अवघ्या काही वेळेत हा ताबा सुटण्यासाठी त्याने प्रयत्न केला. ही कुस्ती खेळण्यास वेळ लागल्याने पंचानी पाच मिनिटांच्या वेळेत जो कुस्ती जिंकेल त्यांना विजय घोषित केले जाईल, असे सांगितले. एकाच डावावर अवघ्या काही मिनिटांत साबाने जोगिंदरला आस्मान दाखविले. साबा हा ‘वारणा साखर किताब’चा मानकरी ठरला. ‘तात्यासाहेब कोरे दूध-साखर वाहतूक’ किताबासाठी पुण्याचा किरण भगत विरुध्द दिल्लीचा अजय गुज्जर यांच्यात झालेल्या लढतीत सुरुवातीपासून अजर गुज्जर याने भगतवर ताबा घेतला होता. अवघ्या पाच मिनिटांत समोरून हप्ता मारल्याने किरण भगत हा चितपट झाला. त्यामध्ये अजय गुज्जरला ‘तात्यासाहेब कोरे दूध-साखर वाहतूक’ हा किताब देऊन सन्मानित केले. ‘वारणा दूध संघ शक्ती’ या किताबासाठी भगवंत केसरी माउली जमदाडे विरुध्द उत्तर प्रदेश केसरी गोपाल यादव यांच्यात लढत झाली. सुरुवातीस दोघे आक्रमक खेळ खेळत होते. माउली जमदाडे याने एकरी पटाने ताबा घेतला. गोपालने डकी डाव खेळण्याचा प्रयत्न केला; मात्र पुन्हा माउलीने घुटना डावावर नवदळ घिस्सा डावावर तेराव्या मिनिटांत गोपाल यादव यांना आस्मान दाखवून ‘वारणा दूध संघ शक्ती’ हा बहुमान पटकाविला.
‘वारणा ट्रकर ऊस वाहतूक किताब’साठी झालेल्या लढतीत महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा समाधान घोडके विरुद्ध कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्यात लढत झाली. सुरुवातीपासून घोडके याने केसरीवर ताबा घेतला. दोन्ही मल्लांना वेळेचे भान ठेवून कुस्त्या करण्याच्या सूचना दिल्या. दोघांचीही धरपकड सुरू होती; मात्र कुस्ती खेळताना समाधान घोडके जखमी झाल्याने कार्तिक काटे यास पंचानी विजयी घोषित केले. कार्तिक हा ‘वारणा ट्रकर ऊस वाहतूक किताब’चा मानकरी ठरला. ‘वारणा बँक शक्ती’ किताबासाठी उपभारत बाला रफिक विरुध्द हरियाणा केसरी प्रवीण भोला यांच्यात दहा मिनिटे कुस्ती सुरू होती. सुरुवातीपासूनच बाला रफिक याने आपली पकड मजबूत केली होती. प्रवीण भोलाने घुटना डाव टाकत गेला आतून घुटना डावावर बाहेरून आकडी लावून विजय मिळवत ‘वारणा बँक शक्ती’ किताब हा पटकाविला.  ‘ईडीएफ मान इंडिया शक्तीr’ किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार विरुध्द राष्ट्रीय विजेता शिवराज राक्षे यांच्या लढतीत शिवराज राक्षे यांनी निकाल डावावर आस्मान दाखवून्ी ‘ईडीएफ मान इंडिया शक्ती’ किताब पटकाविला. ‘शेतीपूरक शक्तीr किताबा’साठी कौतुक डाफळे विरुद्ध राष्ट्रीय विजेता लवप्रित यांच्या लढतीत घुटना डावावर डाफळे यांनी चितपट करण्याचा प्रयत्न केला; मात्र डाफळे हा जखमी झाल्याने लवप्रित यास पंचानी विजय घोषित केले. लवप्रित यांना ‘शेतीपूरक शक्ती’ हा किताब देण्यात आला. ‘बिलट्युब शक्ती किताब’साठी योगेश बोंगाळे विरुध्द विलास डोईफोडे यांच्यात झोळे डावावर विलास डोईफोडेने विजय मिळविला. ‘दूध कामगार शक्ती’ किताबासाठी संग्राम पाटील विरुध्द विष्णू खोसे यांच्या लढतीत खोसे यांनी घुटना डावावर चितपट करून ‘दूध कामगार शक्ती’ हा किताब मिळविला.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More