नवी दिल्ली – मंगळवारी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण दिल्ली हादरली. यानंतर आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत ‘तात्काळ कृषीविरोधी कायदे मागे घेण्यात यावे’, अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे.
राहुल गांधी यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये महात्मा गांधी यांचा ‘विनम्रतेने तुम्ही जग हलवू शकता’ हा सुविचार सांगितला आहे. त्यानंतर ‘पुन्हा एकदा मोदी सरकारला आवाहन आहे की, तात्काळ कृषी विरोधी कायदे मागे घेण्यात यावे’, असे त्यांनी म्हटले आहे.
“विनम्र तरीक़े से आप दुनिया हिला सकते हैं।”
-महात्मा गांधी
एक बार फिर मोदी सरकार से अपील है कि तुरंत कृषि-विरोधी क़ानून वापस लिए जाएँ।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 27, 2021
दरम्यान, काल दिल्लीत हिंसाचार घडत असताना राहुल गांधींनी ट्विट करत शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले होते. ‘हिंसा कुठल्याही समस्येचे उत्तर नाही. जखम कुणालीही होवो नुकसान आपल्या देशाचेच होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावे’, असे ट्विट त्यांनी केले होते.