कुमारी मुलगी ही सीलबंद पाकीटासारखी; प्राध्यापकाचे आक्षेपार्ह वक्तव्य – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

कुमारी मुलगी ही सीलबंद पाकीटासारखी; प्राध्यापकाचे आक्षेपार्ह वक्तव्य

कोलकत्ता – जादवपूर विद्यापीठाच्या कनक सरकार या प्राध्यापकाने मुलींच्या कौमार्याबाबत आक्षेपार्ह भाष्य करणारी फेसबुक पोस्ट केली आहे. यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. आणि निर्लज्जासारखे हे माझं वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. ‘व्हर्जिन ब्राइड-व्हाय नॉट?’ (व्हॅल्यू ओरिएंटेड सोशल काउंसिलिंग फॉर एज्युकेशन) अशा शीर्षकाची पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी कोल्ड ड्रिंकची बॉटल आणि बिस्कीटच्या पुड्याचे उदाहरण दिले आहे. जेव्हा तुम्ही कोल्ड ड्रिंकची बॉटल किंवा बिस्कीटचा पुडा विकत घ्यायला जाता तेव्हा बंद असलेला म्हणजेच नवीन असेल तेच घेता. बॉटल अर्धी उघडली असेल किंवा पुडा अर्धा उघडला तर ते घेणार नाही. तसंच जैविकदृष्ट्या मुलगी ही जन्मापासून सीलबंद असते. मूल्य, संस्कृती, लैंगिक स्वच्छता म्हणजे व्हर्जिन असणे आणि व्हर्जिन मुलगी ही सीलबंद पाकीतासारखी असते अशी प्रकारचे आक्षेपार्ह वाक्य त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टवर विरोध व्हायला लागल्यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट करत लिहिले की, ते माझे वैयक्तिक मत होते. घटनेनुसार मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. यावेळी त्यांनी लेखिका तस्लिमा नसरीन, बंगाली कवी श्रीजतो यांचे उदाहरण दिले. ते जेव्हा लिहितात तेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून त्यांनी पाठींबा देतो असे तो म्हणाला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा लीना गंगोपाध्याय यांनी या पोस्टबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही लोकांच्या दृष्टीकोनात नगण्य असाच बदल झाला आहे हेच या पोस्ट वरून जाणवत असल्याचं त्या म्हणाल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More