कुमारस्वामींनी घेतली सोनिया, राहुल गांधींची भेट – eNavakal
News देश राजकीय

कुमारस्वामींनी घेतली सोनिया, राहुल गांधींची भेट

उपमुख्यमंत्रिपदावर घेणार उद्या निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली – जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी आज संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी कुमारस्वामी यांनी दोघांनाही कर्नाटकमधील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. दरम्यान  कुमारस्वामींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधीसोबत कर्नाटक सरकारमधील मंत्रिमंडळाबाबत चर्चा केली.
नव्या सरकारमधील उपमुख्यमंत्रिपदावर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.  कुमारस्वामी आणि काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये झालेल्या चर्चेपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी 30-30 महिन्यांचा करार झाला असून सुरुवातीचे 30 महिने कुमारस्वामी आणि नंतरच्या काळात काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील अशी महिती उघड झाली आहे. मात्र कुमारस्वामी यांनी याबाबत बोलताना  काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही करार झाला नसल्याचे स्पष्ट केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

सबरीमालात स्त्रियांनी प्रवेश केल्याने केरळ बुडाले

तिरुअनंतपुरम – रिझर्व्ह बँकेचे हंगामी निर्देशक एस गुरुमूर्ती यांनी अत्यंत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. केरळवर आसमानी संकट कोसळले असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू...
Read More
post-image
क्रीडा देश

#AsianGames2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच 10 नवीन गेम्स

जकार्ता – 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा जकार्ता येथील गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर संपन्न झाला. या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 नवीन गेम्स पहिल्यांदाच...
Read More
post-image
News देश

संगमनेर तालुक्यात भूकंप?

संगमनेर – तालुक्यातील घारगाव आणि माहुली परिसरात काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घारगाव आणि माहुली परिसरातील भूगर्भामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

सचिन अणदुरेला ७ दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी धडक कारवाई केली. या कारवाईत सीबीआयने आरोपी सचिन अणदुरे याला औरंगाबादमधून अटक केली. आरोपी सचिन अणदुरेची...
Read More
post-image
गुन्हे देश

दिल्लीची मोस्ट वॉण्टेड ‘मम्मी’ अखेर गजाआड

नवी दिल्ली – तब्बल 113 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेली दिल्लीची मोस्ट वॉण्टेड फरार ‘मम्मी’ बशीरन हिला पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानची मुळ रहिवासी असलेली बशीरन ही...
Read More