कुंभार समाजाचे 15 डिसेंबरला वाशिम जिल्हाधिकार्‍यांसमोर आंदोलन – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

कुंभार समाजाचे 15 डिसेंबरला वाशिम जिल्हाधिकार्‍यांसमोर आंदोलन

मालेगाव –
गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी कुंभार समाजाने ‘एल्गार’ पुकारला असून येत्या 15 डिसेंबर रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यात समाजबांधवांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा आश्वासन देऊनही कुंभार समाजासाठी मातीकला बोर्ड अद्याप स्थापन झालेले नाही. याशिवाय इतरही अनेक मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. दरम्यान, झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More