किसान लॉंग मार्च; अशोक चव्हाण आणि कुमार केतकर यांची प्रतिक्रिया – eNavakal
आंदोलन मुंबई

किसान लॉंग मार्च; अशोक चव्हाण आणि कुमार केतकर यांची प्रतिक्रिया

मुंबई-  विविध मागण्यासाठी अन्नदात्याने पुकारलेल्या एल्गार आता महत्वाच्या टप्प्यावर पोचला असून थॊड्याच वेळापूर्वी किसान सभेचे शिष्टमंडळ सरकारच्या समितीशी चर्चा करण्यास दाखल झाले असून थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु होणार आहे. किसान सभेचे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करून परत आझाद मैदानावर येईल आणि त्यानंतर किसान सभेच्या समितीशी चर्चा करून पुढील निर्णय घेईल असे वृत्त आहे. तसेच या मोर्चा संबंधितकॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण व कुमार केतकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

यावर अशोक चव्हाण यांनी म्हटले की, परिस्तिथी स्फोटक होतेय. हे सरकार संवेदनाहीन आहे. सध्याचे सरकार हे फक्त खोट्या घोषणा करत आहे. शेतकऱ्याच्या मागण्या मान्य होत नाही त्यामुळे हा लॉंग मार्च योग्यच असल्याचं चव्हाण यांनी म्हटले आहे.  यासह कुमार केतकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, कामगार व शेतकऱ्यांचे हिताचे धोरण सरकारने चालवणे महत्वाचे आहे. त्यामुळे हे आंदोलन योग्यच असे केतकर यांनी म्हटले. शेतकऱ्यांसाठी हे सरकार धोकादायक आणि अपयशी ठरले आहे. मोदींनी शेतमालाला हमीभाव देऊ असे म्हटले होते मात्र हे आश्वासन सरकार पूर्ण करू शकले नाही. शिवसेनेने किसान लॉंग मार्चला पाठिंबा देऊन योग्य भूमिका घेतली आहे. तसेच सरकारने योग्य धोरणांची अंमलबजावणी करावी. असे कुमार केतकर यांनी किसान लॉंग मार्चच्या संदर्भात बोलताना म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

लक्ष्मीनगर परिसरात अपघात! दोन जणांचा मृत्यू

मुंबई-  घाटकोपर – अंधेरी लिंक रोडवर लक्ष्मीनगर परिसरात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको सुरू...
Read More
post-image
News मुंबई

रस्ते, फूटपाथ खड्डेमुक्त केले जातील महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

मुंबई -शहरातील रस्ते, फूटपाथ खड्डे बुजविण्यास मेटा कुटीला आलेल्या मुंबई महापालिकेने पावसाळ्यात खड्डे बुजविण्याबरोबर त्या खड्ड्यांचा सामना करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. पावसाळ्यापूर्वी आणि...
Read More
post-image
देश

दुरान्तो एक्स्प्रेसवर दरोडा; चोरटे एसी डब्यात घुसले

दिल्ली- रेल्वे मार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान घडली आहे. पहाटे तीनच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More