किर्ती व्यास हत्याप्रकरण आरोपींना 31 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी – eNavakal
न्यायालय मुंबई

किर्ती व्यास हत्याप्रकरण आरोपींना 31 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई – अंधेरी येथील बीब्लंट कंपनीतील फायनान्स मॅनेजर किर्ती राजेंद्र व्यास या 28 वर्षांच्या तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या दोन्ही आरोपींची गुरुवारी येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या दोघांनाही गुरुवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांची चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना 31 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. त्यानंतर सिद्धेशला आर्थर रोड तर खुशीला भायखळा येथील महिला कारागृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ग्रँटरोड येथे राहणारी किर्ती व्यास ही अंधेरीतील बिब्लंट या खाजगी कंपनीत ती फायनान्स मॅनेजर म्हणून काम करीत होती. याच कंपनीत सिद्धेश शांताराम ताम्हणकर आणि खुशी अजय सजवानी हे दोघेही कामाला होते. 16 मार्चला किर्ती कामावर गेली आणि परत आली नाही. कंपनीपर्यंत लिफ्ट देण्याचा बहाणा करून या दोघांनी खुशीच्या कारमधून किर्तीचे अपहरण केले आणि नंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह वडाळ्यातील एका नाल्यात फेकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मिसिंगची तक्रार होताच या दोघांनीच किर्तीची हत्या करून तिचा मृतदेह आणि लॅपटॉप असलेली बॅग वडाळ्यातील एका नाल्यात फेकून दिल्याचे सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More