किराणा दुकानांवरील प्लॅस्टिक पॅकिंगला सूट – पर्यावरणमंत्री – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मंत्रालय महाराष्ट्र मुंबई

किराणा दुकानांवरील प्लॅस्टिक पॅकिंगला सूट – पर्यावरणमंत्री

मुंबई – मोठ्या उत्पादकांना आपले उत्पादन प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये देण्याची सवलत आता किरणा दुकानांवरील प्लॅस्टिक पॅकिंगलाही लागू होणार आहे. याविषयीची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. पावकिलोपेक्षा अधिक वजनाचा माल पॅकिंग करण्यासाठी ही सूट देण्यात आली असून हे प्लॅस्टिक पुन्हा रस्त्यावर  येणार नाही त्याचे रिसायकलिंग केले जाईल याची काळजी या दुकानदारांना  घ्यावी लागणार आहे.
किराणा दुकानदारांना प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये देण्यात आलेल्या सवलतीबाबतची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. ते म्हणाले, किरणा दुकानदारांच्या शिष्टमंडळाने प्लॅस्टिक पॅकिंगसाठी सूट मिळावी म्हणून शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. प्लॅस्टिक पॅकिंग विषयीच्या या प्रस्तावाबाबत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत किरणा दुकानांवरील प्लॅस्टिक पॅकिंगसाठी असलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
तर पावकिलोवरील किराणा मालाच्या पॅकिंगसाठी असलेली प्लॅस्टिक बंदी मागे घेण्यात आली असली तरी हे प्लॅस्टिक परत घेण्याची ही जबाबदारी संबंधित दुकानदारांची असणार आहे. हे प्लॅस्टिक रस्त्यावर येणार नाही याची काळजी संबंधित दुकानदारांची असणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More