किरण मोटेंची ‘घरवापसी’; विनायक रणसुभे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश – eNavakal
महाराष्ट्र

किरण मोटेंची ‘घरवापसी’; विनायक रणसुभे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पिंपरी – राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किरण मोटे आणि विनायक रणसुभे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसेनेसाठी हा धक्का मानण्यात येत आहे. शिवसेनेत घुसमट होत असल्याने जय महाराष्ट्र केला, अशी प्रतिक्रिया विनायक रणसुभे यांनी दिली आहे. विनायक रणसुभे आणि किरण मोटे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

किरण मोटे हे २०१२ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. शिवसेनेकडून त्यांना पिंपरी विधानसभेच्या उमेदवारीची अपेक्षा होती. परंतु, शिवसेनेतच विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी पाहता, त्यांनी टआपलाच गाव बरा गड्या…’ या भावनेतून घरवापसी केली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More