किरण भगतची मनजितसिंगवर मात – eNavakal
क्रीडा महाराष्ट्र

किरण भगतची मनजितसिंगवर मात

सांगली – उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतनं डब्ल्यूडब्ल्यूई पैलवान मनजीतसिंगला सहा मिनिटांत अस्मान दाखवून लोखंडी पिंजऱ्यातली कुस्ती जिंकली. सांगलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर या ऐतिहासिक कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात होणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच कुस्ती होती. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या हजारो कुस्तीशौकिनांनी ही कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती.

मनजीतसिंग हा किरण भगतपेक्षा वजनानं आणि उंचीनंही भारी होता. त्यामुळं या कुस्तीवर तो वर्चस्व गाजवेल, असा अंदाज होता. पण किरण भगतनं चपळाईनं डाव टाकत आधी मनजीतसिंगवर कब्जा मिळवला आणि मग त्यालाही चीतपटही केलं. या ऐतिहासिक कुस्तीमध्ये किरण भगतने मनजीतसिंगला आस्मान दाखवलं. लोखंडी पिंजऱ्यातील या  कुस्तीमध्ये किरणने अवघ्या काही मिनिटात मनजितसिंगवर मात केली. ही पोलादी कुस्ती जिंकणाऱ्या किरण भगतनं तब्बल 4 लाखांचं बक्षीस पटकावलं आहे. तर उपविजेत्या मनजितसिंगला देखील 1 लाखाचं बक्षीस देण्यात आलं. या कुस्तीला पाहुणे म्हणून भिडे गुरुजीही उपस्थित होते. त्याचप्रमाणे तुझ्यात जीव रंगला… फेम राणा दा (हार्दिक जोशीने) देखील हजेरी लावली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

त्रालमध्ये चकमक! एका दहशतवाद्याला कंठस्नान

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली इमारतीतील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More