किरकोळ वादातून भिकाऱ्याने केली भिकाऱ्याची हत्या – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

किरकोळ वादातून भिकाऱ्याने केली भिकाऱ्याची हत्या

नाशिक – किरकोळ कारणावरून वाद होवून एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्यास मारहाण करत त्याच्या पायावर चाकूने वार केला. उपचारादरम्यान जखमी भिकाऱ्यlचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सांयकाळी रामकुंड परिसरात घडली. पंचवटी पोलिसांनी संशयित भिकाऱ्यास अटक केली आहे. भिकाऱ्याने भिकाऱ्याची हत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
अरूण भामरे आणि संतोष आपटे या दोघा भिकाऱ्यांमध्ये वाद झाला. संतापलेल्या आपटे याने अरूण भामरे यांना मारहाण करत त्यांच्या पायावर छोट्याशा चाकूने वार केला. जखमी अवस्थेत पडलेल्या भामरे यांना उपचारासाठी परिसरातील लेiकानी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान भामरे याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आपटे यांना ताब्यात घेतले. पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रल्हाद मुंढे करत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More