किम जाँग-उनची क्रूरता; 90 गोळ्या झाडून दिला मृत्युदंड – eNavakal
विदेश

किम जाँग-उनची क्रूरता; 90 गोळ्या झाडून दिला मृत्युदंड

सेऊल – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन याने आपल्या एका वरिष्ठ सैन्याधिकार्‍याला जाहीर शिक्षा देऊन तब्बल 90 गोळ्या झाडून मृत्युदंडांची शिक्षा सुनावली. किमने याची जबाबदारी 9 जणांवर सोपवली होती. सैन्य अधिकार्‍याला राजधानी प्योंगयोंग येथील मिलिटरी अ‍ॅकॅडमीमध्ये सजा-ए-मौत देण्यात आली.

लेफ्टनंट जनरल ह्योंग जू-सोंगवर जवानांना निश्चित प्रमाणापेक्षा जास्त अन्न आणि इंधन वाटल्याचे आरोप होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना अधिकारांचा चुकीचा वापर करणे आणि देशद्रोहाचा आरोपी ठरवण्यात आले होते. यापूर्वीही किमने मीटिंगमध्ये डुलकी घेणार्‍या आपल्या संरक्षण प्रमुख ह्योंग योंग यांनाही मृत्युदंड ठोठावला होता. ह्योंगने 10 एप्रिल रोजी एका सॅटेलाइट लॉन्चिंग स्टेशनचे निरीक्षण केले होते. ते म्हणाले होते की, आता अण्वस्त्रे आणि रॉकेट बनवण्यासाठी आम्ही उपाशी राहू शकत नाही. तेव्हा सैन्याच्या या अधिकार्‍याने जवानांच्या कुटुंबीयांसाठी जास्त तांदूळ आणि इंधन वाटण्याचे निर्देश दिले होते. यानंतर हुकूमशहाला ह्योंगची ही बाब खटकली. किमच्या आदेशावरून या अधिकार्‍याला मृत्युदंड देण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More