काश्मीर खोऱ्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवणार – सुब्रमण्यम – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

काश्मीर खोऱ्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवणार – सुब्रमण्यम

नवी दिल्ली – काश्मीर खोऱ्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जातील, अशी घोषणा जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बी. वी. आर. सुब्रमण्यम यांनी आज पत्रकार परिषदेत केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्बंध लावलेले असून लष्कर-ए-तोयबासारख्या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांकडून येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन संचारबंदी हटविण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले. दरम्यान, एक आठवड्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी करण्यात आली असून नागरिकांना अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

काय म्हणाले सुब्रमण्यम

आज रात्री (शुक्रवार) पासून हळूहळू दूरध्वनी सुरू होईल. निर्बंधदेखील हळूहळू दूर केले जातील.

सोमवारपासून क्षेत्रानुसार शाळा सुरू केल्या जातील. शासकीय कार्यालये आजपासून पूर्णपणे कार्यरत झाली आहेत.

माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या नेत्यांच्या स्थानबद्धतेचे जसजशी परिस्थिती निवळत जाईल, तसतसे परीक्षण करण्यात येईल.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कायद्याच्या तरतुदीनुसार काही व्यक्तींना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली.

पूर्वीच्या आंदोलनांप्रमाणे या संचारबंदीदरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही. दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर यांनी सर्व प्रयत्न करूनही जीवितहानी झाली नाही.

निर्बंधादरम्यान अन्न आणि वैद्यकीयसारख्या अत्यावश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात पुरवल्या जात आहेत. दूरदर्शन, वर्तमानपत्रे प्रकाशित केली जात आहेत आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्ध आहेत.

सार्वजनिक वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात येईल

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

322 पीएसआय पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा! भरती प्रक्रियेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या 322 पोलीस उपनिरीक्षक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरती प्रक्रियेत पूर्व आणि मुख्य परिक्षांतील आरक्षणाचा मुद्दा...
Read More
post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More