काश्मीरमधून संचारबंदी तत्काळ हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

काश्मीरमधून संचारबंदी तत्काळ हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील कलम १४४ (संचारबंदी) तत्काळ हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हे अत्यंत संवेनशील प्रकरण असल्याने परिस्थिती सर्वसामान्य होण्यासाठी आणखी कालावधी लागेल. सरकारला त्यासाठी वेळ द्यायला हवा, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधील कलम १४४ हटविण्यासंदर्भातील याचिकांवर सुनावणी देण्यास नकार दिला आहे.

तसेच सरकारने नियमितपणे जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घ्यावा. कोणत्याही मानवाधिकाराचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, जर स्थिती सर्वसामान्य होण्याची चिन्हे दिसत नसतील तर हे प्रकरण न्यायालयापुढे आणावे. त्यावेळी आम्ही ठरवू, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर २ आठवड्यानंतर सुनावणी करू, असे म्हटले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अटॉर्नी जनरलना जम्मू काश्मीरमध्ये आणखी किती काळ बंदी परिस्थिती कायम राहील असा प्रश्न विचारला. त्यावर आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. जम्मू-काश्मीरसंदर्भातील निर्णय झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये कोणतीही दुर्घटना झालेली नाही. रक्ताचा थेंबही आम्ही सांडू दिला नसल्याचे अटॉर्नी जनरल यांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नरेेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण! विक्रम भावेचा जामीन फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेल्या विक्रम भावेचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र

विक्रमगडमधील पूल मोजताहेत शेवटची घटका

विक्रमगड – तालुक्यातील अनेक वर्षापासूनचे पूल मोडकळीस आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटीशकालीन विक्रमगड-गडदे मार्गावरील तांबडी नदीचा पूल, साखरे गावातील देहेर्जे नदीवरील पूल, नागझरी बंधारा...
Read More