काश्मिरींना पाठींब्यासाठी इम्रान खानची सभा – eNavakal
देश विदेश

काश्मिरींना पाठींब्यासाठी इम्रान खानची सभा

इस्लामाबाद – जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव अतिशय वाढला आहे. पाकिस्तानला कोणताही देश मदत करण्यास तयार नाही. मात्र तरीही पाकिस्तानकडून हालचाली सुरूच आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादमध्ये १३ सप्टेंबर रोजी सभेचे आयोजन केले आहे. भारतातील जम्मू-काश्मीरला भारतीय सैन्याकडून सतत होणाऱ्या घेरावाबाबत जगाला सांगण्यासाठी आणि काश्मीरच्या नागरिकांना पूर्ण पाकिस्तान तुमच्या पाठीशी उभा आहे, हे दाखवून देण्यासाठी मी १३ सप्टेंबर रोजी सभेचे आयोजन केले असल्याचे, इम्रान खान यांनी ट्विटवर म्हटले आहे.

दरम्यान, भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानने राष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित केला, मात्र सर्वत्र पाकिस्तानला अपयश आले आहे. संयुक्त राष्ट्रातही जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने सणसणीत प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप खोडून काढत, पाकिस्तान खोटेनाटे आरोप करत असून भारताने काश्मीरबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशी पाऊल उचलले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत सांगितले.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More