काळ्या यादीतील कंपनी पुन्हा काळ्या यादीत कशी? – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

काळ्या यादीतील कंपनी पुन्हा काळ्या यादीत कशी?

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल कोसळल्यानंतर पालिकेने प्राथमिक चौकशी करून काल सायंकाळी कारवाई केली. या कारवाईत आरपीएस इन्फ्रा ही कंत्राटदार कंपनी काळ्या यादीत का टाकू नये याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविल्याचे म्हटले आहे. मात्र हा कारवाई अहवाल ही मुंबईकरांची फसवणूक असल्याचे उघड झाले आहे.

२०१६ साली मुंबई महापालिकेत रस्ते बांधणीत अंदाजे ३५० कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा जी चौकशी झाली त्यातून अनेक कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले होते. यात पूल दुर्घटनेतील जबाबदार आरपीएस इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचा समावेश होता. एकदा कंपनीला काळ्या यादीत टाकले की ती कारवाई पुढील ६ वर्षांसाठी असते. त्यामुळे काळ्या यादीतील आरपीएस इन्फ्राला पूल दुर्घटना प्रकरणी पुन्हा काळ्या यादीत कसे टाकता येते? ही कंपनी काळ्या यादीत असताना त्यांना पुन्हा काळ्या यादीत टाकण्यासाठी कारणे दाखवा नोटीस कसली बजावता? हा सवाल विचारला जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More