काळजी नको! वैद्यकीय तज्ज्ञ घरी येऊन करणार कोरोनाची चाचणी – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

काळजी नको! वैद्यकीय तज्ज्ञ घरी येऊन करणार कोरोनाची चाचणी

मुंबई – कोरोना आजार झपाट्याने संसर्जित होत असल्याने अतिशय काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने सर्दी, खोकल्याची लक्षणं असलेल्या रुग्णांची घरी जाऊन तपासणी करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी पालिकेने पाच खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्या असून या प्रयोगशाळेतील तज्ज्ञ घरी येऊन संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करत आहेत.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्याने कंबर कसली आहे. राज्यातील विविध महापालिका आपल्या क्षेत्रातील लोकांची काळजी घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनेही आपल्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची ससेहोलपट होऊ नये याकरता मुंबई पालिकेने रुग्णांच्या घरी जाऊन कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची लक्षणं आढळल्यास नागरिकांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घ्यावं आणि पालिकेने जारी केलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. त्यामुळे रुग्ण घराबाहेर पडणार नाही आणि इतरांनाही त्याची बाधा होणार नाही.

या पाच खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांशी साधा संपर्क:

>> सबर्बन डायग्नोस्टिक्स : ०२२-६१७०-००१९

>> थायरोकेअर : ९७०२-४६६-३३३

>> मेट्रोपोलीस: ८४२२-८०१-८०१

>> सर एच एन‌ रिलायन्स : ९८२०-०४३-९६६

एसआरएल लॅब :

>> ही चाचणी करण्यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांचे चाचणीसाठीचे शिफारसपत्र (Prescription) असणे आवश्यक आहे. हे पत्र नागरिकांना त्यांच्या जवळच्या डॉक्टरांकडून घेता येईल.

>> ज्या व्यक्तींना दमा, श्वसनाचे आजार, निमोनिया, ताप, थंडी, खोकला यासारख्या बाबी आहेत, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही चाचणी करवून घेण्यास हरकत नाही.

पालिका साधतेय संवाद
‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या सुमारे १ हज़ार २०० संशयित रुग्णांशी पालिकेच्या ४० डॉक्टरांनी संवाद साधून त्यांची सद्यस्थिती जाणून घेतली आहे. या दूरध्वनी संवादादरम्यान ज्या रुग्णांमध्ये सकृतदर्शनी लक्षणे जाणवून आली, अशा ७ संशयित व्यक्तींना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतून तातडीने कोरोना चाचणी करवून घेण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिकेचे डॉक्टर या सर्व व्यक्तींच्या नियमितपणे संपर्कात आहेत, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १२४वर! आरोग्यमंत्र्यांची माहिती

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More