काळजी घ्या! जगभरात झपाट्याने पसरतोय ‘हा’ व्हायरस – eNavakal
आघाडीच्या बातम्या आरोग्य देश

काळजी घ्या! जगभरात झपाट्याने पसरतोय ‘हा’ व्हायरस

 नवी दिल्ली – सध्या वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली असून विविध विकारांची उपचार पद्धती, औषध पद्धती यांच्यात आमूलाग्र संशोधन होत आहे. मात्र जगभरात कैंडिडा ऑरिस हा व्हायरस झपाट्याने पसरत आहे.  हा व्हायरस इतका विकसित झाला आहे की तो मानवासाठी जीवघेणा बनला आहे. हा व्हायरस रक्तप्रवाहात पोहचल्यानंतर शरीरात घातक संक्रमण निर्माण करतो. यामध्ये भितीदायक गोष्ट म्हणजे सध्या या व्हायरसवर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी हा व्हायरस जिवंत राहतो आणि सहजपणे इतरांच्या शरीरात प्रवेश करून त्यांना देखील रुग्ण बनवू शकतो. हा व्हायरस अश्या लोकांच्या शरीरात प्रवेश करतो ज्यांची प्रतिकार शक्ती कमकुवत आहे.

कैंडिडा ऑरिस व्हायरसचा शोध 2009 साली जपानमधील रुग्णालयात शास्त्रज्ञांनी घेतला. गेल्या काही वर्षांत हा व्हायरस जगभरात पसरला आहे. हा व्हायरस सध्या भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, न्यू यॉर्क, न्यू जर्सी, इलिनॉय या देशात पसरला आहे. फेडरल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने या व्हायरसला अश्या जीवाणूंच्या यादीत ठेवले जे आजच्या काळात मानवजातीसाठी धोकादायक आहेत. अहवालात म्हटले आहे की, कॅंडिडा ओरिसचे पीडित रुग्ण 90 दिवसांत मरण पावतात.

ताप, वेदना आणि कमजोरी ही कैंडिडा ऑरिसची लक्षणे आहेत. याचबरोबर एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमजोर असल्यास कैंडिडा ऑरिस त्या व्यक्तीवर आपली पकड मजबूत करतो. मानवजातीचा या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More
post-image
News मुंबई

मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरची जागा का नको-हायकोर्ट

मुंबई – मुंबईतील संवेदनशील आरे कॉलोनीतील हजारो झाडांचा बळी घेऊन आणि पर्यावरणाचा र्‍हास करून मेट्रो कारशेड उभारण्या ऐवजी कांजूरमार्ग येथे मोकळ्या जागेचा पर्याय म्हणून...
Read More