कार्यालयात वेळेवर पोहोचायचं! मोदींचे मंत्र्यांना आदेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

कार्यालयात वेळेवर पोहोचायचं! मोदींचे मंत्र्यांना आदेश

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सर्व मंत्र्यांनी वेळेवर कार्यालयात हजर राहावे आणि घरून काम करणे बंद करावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. शपथविधीनंतर प्रथमच पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांच्या भेट घेऊन त्यांना जबाबदारी सांभाळून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले. मंत्र्यांनी ५ वर्षांचा कार्यक्रम आखून त्यानुसार काम करावे, ४० दिवसांच्या संसदेच्या अधिवेशनकाळात कुणीही बाहेरचे दौरे काढू नये, सर्व राज्यमंत्र्यांपर्यंत महत्त्वपूर्ण निर्णय वेळोवेळी पोहोचवावे, असेही त्यांनी म्हटले. काम सुरळीत आणि सुव्यवस्थित पार पडावे व इतरांपुढे आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मंत्री आणि खासदारांमध्ये फार अंतर नसते, त्यामुळे मंत्र्यांनी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना भेटीसाठी वेळ दिला पाहिजे, अशी सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी केली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण वेळेवर कार्यालयात पोहोचत असू, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More