कारमध्ये स्पार्क होत असल्याचे फसवणुक करणार्‍या त्रिकुटास अटक – eNavakal
गुन्हे मुंबई

कारमध्ये स्पार्क होत असल्याचे फसवणुक करणार्‍या त्रिकुटास अटक

मुंबई- कारमधून स्पार्क होत असल्याची बतावणी करुन लोकांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा नवघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका त्रिकुटास पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या अटकेने फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद सुफीयान सलीम कुरेशी ऊर्फ कल्लू, काजिम ऊर्फ मुन्ना लाल खान आणि कासिम ऊर्फ छोटेलाल खान अशी या तिघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत आहेत. रविवारी सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास आनंदनगर जकातनाक्यावर काहीजण कारचालकांना त्यांच्या कारमधून स्पार्क होत असल्याचे सांगत असून दिशाभूल करीत होते. हा प्रकार एका कारचालकाकडून गस्तीवर असलेल्या नवघर पोलिसांना समजली होती. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल वालघाडे यांच्या पथकातील पोलीस पथकाने साध्या वेशात तेथून कार नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही अंतरावरुन तीन तरुणांनी त्यांच्या कारमधून स्पार्क होत असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कार थांबविली. यावेळी तीनजण तिथे आले आणि त्यांनी कारमधील अल्टनेटर आणि कॉईल नवीन टाकावी लागेल असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकाळण्याचा प्रयत्न केला. ते तिघेही पैसे उकाळण्याच्या उद्देशाने अशा प्रकारे बतावणी करीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. चौकशीत ते तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी, मानखुर्द, देवनार, शिवाजीनगर, विक्रोळी, भांडुप, गोवंडी आणि समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यातील काही गुन्ह्यांत त्यांना अटक झाली होती. मोहम्मद सुफीयान हा टोळीचा प्रमुख असून त्याला एमआयडीसी रबाले पोलीस ठाण्यात वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

पोलीस कोठडीतील पिता-पुत्राच्या मृत्यूबद्दल तामिळनाडूच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

चेन्नई – तामिळनाडू राज्यातील तुतिकोरीन शहरातील पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स या पिता-पुत्रांना पोलीस कोठडीत मरेपर्यंत अमानुष मारहाण आणि अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याप्रकरणी...
Read More
post-image
कोरोना देश

केरळमध्ये ५२ सीआयएसएफ जवानांना कोरोना लागण

तिरुवअनंतपुरम – गेल्या दोन आठवड्यांमध्ये केरळच्या कण्णूरमधील तब्बल ५२ सीआयएसएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच सीआयएसएफ दलात खळबळ उडाली. त्यामुळे सर्व जवानांना विलगीकरणात ठेवण्यात...
Read More
post-image
राजकीय विदेश

व्लादिमीर पुतीन 2036पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहणार

मॉस्को – गेली 20 वर्षे रशियाचे अध्यक्ष असलेले व्लादिमीर पुतीन हे आणखी 16 वर्षे म्हणजे 2036पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहणार आहेत. त्यासाठी संपूर्ण रशियामध्ये जनमत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

तुकाराम मुंढेविरोधात न्यायालयात जाण्याचा भाजपाचा इशारा

नागपूर – नागपूर महापालिकेचे शिस्तप्रिय आयुक्त तुकाराम मुंढे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण स्मार्ट सिटी अनियमितता प्रकरणात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे गोत्यात येणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा! ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई – काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस मुंबईत काही ठिकाणी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर या...
Read More