कारगिल विजय दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

कारगिल विजय दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

नवी दिल्ली – 26 जुलै 1999 रोजी पाकविरुद्ध झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या घटनेला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धात भारताच्या 527 जवानांना हौतात्म्य आलं होतं. युद्धातील शहीद व जखमी शूरवीर जवानांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज या दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईतही नौदलाच्या पश्चिम कमांडने पुढाकार घेऊन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सिने कलावंत व सैनिक यांच्यात फुटबॉलचा सामनादेखील रंगणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात नौदलाच्या कुलाबा परिसरातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल पी. अजित कुमार यावेळी उपस्थित असतील. त्यानंतर नौदलाच्या ताफ्यातील आयएनएस मुंबई व आयएनएस चेन्नई या दोन युद्धनौका शालेय विद्यार्थ्यांना पाहता येतील. सकाळच्या सत्रातील या दोन कार्यक्रमांनंतर सायंकाळी फुटबॉलचा सामना रंगणार आहे. नरिमन पॉइंट येथील कुपरेज मैदानावर सायंकाळी साडेसहा वाजता हा सामना सुरू होईल. त्याआधी नौदलातील सामग्रींचे प्रदर्शन तसेच कारगिल युद्धासंबंधी माहितीपटाचे सादरीकरण त्याच ठिकाणी केले जाईल.

आज राज्यभरात ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ पुन्हा दाखवला जाणार

महाराष्ट्रात आज कारगिल विजय दिनानिमित्त ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. 2016 मध्ये दहशतवाद्यांनी उरी येथे भारतीय जवानांच्या तळावर हल्ला केला होता. यात शहीद झालेल्या जवानांचा बदला घेण्यासाठी भारताने पाकमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं, यावर आधारित हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात विक्की कौशलने प्रमुख भूमिका साकारली असून आदित्य धरने यांनी दिग्दर्शन केले आहे. राज्यभरात तब्बल 500 चित्रपटगृहांमध्ये ‘उरी’ हा चित्रपट 18 ते 25 वयोगटातील तरुणांना मोफत दाखवण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने याचे आयोजन केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More