काय लायकी आहे तुमची? छत्रपती उदयनराजेंचा शिवसेनेवर घणाघात – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

काय लायकी आहे तुमची? छत्रपती उदयनराजेंचा शिवसेनेवर घणाघात

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या ‘आज का शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत आज भाजपा नेते आणि माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्यावर हल्ला चढवलाच मात्र शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ‘सतत छत्रपतींच्या वंशजांवर टीका केली जाते मग, शिवसेना जेव्हा काढली तेव्हा नाव देताना विचारलंत का? किंवा महाशिवआघाडीला नाव देताना आणि त्यातून शिव काढताना आम्हाला विचारलं का? आम्ही कधी हरकत घेतली का?’, असा सवाल उदयनराजेंनी यावेळी केला. तसेच ‘शिवसेनेतून शिव काढून दाखवाच आणि ठाकरेसेना करा, मग बघा महाराष्ट्रातले किती तरुण तुमच्या पाठीशी येतात’, असे जाहीर आव्हानच त्यांनी शिवसेनेला दिले. ‘सोयीप्रमाणे महाराजांचे नाव वापरणाऱ्यांनो तुमची लायकी आहे का?’ असा जोरदार घणाघात त्यांनी शिवसेनेवर केला. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिल्या जाणाऱ्या ‘जाणता राजा’ या उपमेवरूनही उदयनराजेंनी जोरदार टीकास्त्र सोडले. ‘पुन्हा आमच्या वाटेला गेलात तर आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, सावध राहा, तुमची हयगय केली जाणार नाही’, अशा शब्दांत उदयनराजेंनी छत्रपतींच्या वंशजांवर टीका करणाऱ्या पक्षांना आव्हान दिले. ते म्हणाले, ‘महाराजांच्या नावाचा वापर सोयीप्रमाणे केलात तर मी नाही, लोक तुम्हाला मारतील.’

आज दुपारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन उदयनराजेंनी, ‘शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही पण प्रबोधनकार ठाकरेंचा तरी मान ठेवावा’, अशी जोरदार टीका केली. तसेच शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खाली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही.  छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही’, असे उदयनराजे भोसले म्हणाले. तसेच ‘मी सत्तेसाठी लूथ भरलेल्या कुत्र्यासारखं कोणाच्या माग पळालो नाही. खासदार म्हणून निवडून आलो राजीनामा दिला. माझ्या बुद्धीला जे पटत नाही ते मी करत नाही. माझं नातं सर्वसामान्यांशी आहे त्यांच्यासाठी जीव द्यायलाही मी तयार आहे’, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना उदयनराजेंनी, ‘या सरकारने राज्याचा खेळखंडोबा केला आहे. स्वार्थी लोक एकत्र येतात ते फार काळ टिकत नाही. त्यांना एकत्र ठेवण्यासाठी ताकदीचा, आमिषाचा वापर करावा लागतो जेव्हा त्यांचा स्वार्थ साध्य होतो तेव्हा ते आपापल्या मार्गाने जातात’, अशी टीका करत, हे सरकार टिकणार नाही असे म्हटले. तर, जाणता राजा अशी उपमा ज्यांना दिली जाते ते शेतकरी मरत होता तेव्हा फाईव्ह स्टार हॉटेलमधून पळवापळवी करत होते, अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका करताना उदयनराजे म्हणाले, ‘आमचे राजीनामे मागण्यापेक्षा यांचे राजीनामे घ्या. लोक खूष होतील.’

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनसे नेते अविनाश जाधव यांचा जामिन अर्ज फेटाळला

ठाणे – परिचारिकांसाठी वसई महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केल्याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

शिवसेनेला हिंदूत्व व सामाजिक बांधिलकीचा विसर, दरेकरांचा हल्लाबोल

खेड – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदूत्वाचा जाज्वल्य विचार केला होता. शिवसेनेने हिंदूत्वावर अनेक निवडणूकाही लढविल्या. पण सध्या सत्तेसाठी शिवसेनेला हिंदूत्वाचा विसर पडलेला...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊतांचा भाजपासाठी फिल्मी डायलॉग, म्हणाले…

मुंबई –  ‘जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते… समझनेवालों को इशारा काफी है,’ अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर...
Read More
post-image
देश राजकीय

भाजपाच्या बंगालमधील 4 खासदारांसह 21 आमदार व नेते ममता बॅनर्जींच्या संपर्कात

कोलकाता – पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस सोडून...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापूरची मार्कंडेय महामुनींची रथयात्रा यंदा कोरोनामुळे रद्द

सोलापूर – दरवर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या नारळी पौर्णिमेनिमित्त पद्मशाली समाजाचे कुलदैवत असलेल्या सोलापुरातील मार्कंडेय महामुनींंची होणारी रथयात्रा यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली...
Read More