कामगार हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम 10 वर्षांपासून सुरूच! – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

कामगार हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम 10 वर्षांपासून सुरूच!

मुंबई – काल संध्याकाळी अंधेरी (पूर्व) एमआयडीसी येथील कामगशार रुग्णालयाला लागलेल्या आगीत 6 ठार 147 जखमी झाल्याची दुर्घटना घडली होती. या उर्वरित परिसरात या हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम गेले 10 वर्षे कासवगतीने सुरू आहे. नवीन बांधण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या इमारतीत किरकोळ कामे सुरू आहेत. त्यासाठी अनेक जागी साहित्य पडून आहेत. हॉस्पिटलमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा नाहीत. आपत्कालीन व्यवस्था नाही. यासाठी व्यवस्थापन आहे. पण त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारितर रुग्णालय आसल्याने फायर ब्रिगेड (अग्निशमन दल) विभागाने अग्नि सुरक्षा यंत्रणेकडे दुर्लक्ष केले आहे. असा धक्कादायक आरोप रुग्णालयातील कामगारांनी केला.

कर्मचारी राज्याविमा महामंडळाचे हे हॉस्पिटल सन 1975 साली 350 खाटांचे या जागी एकमेव हॉस्पिटल होते. या परिसरात मोकळ्या जागेत नवीन हॉस्पिटलचे विस्तार करण्यासाठी सन 2009 साली नवीन हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आणि ही पाच मजली इमारत नॅशनल बिल्डींग कन्ट्रक्शन कॉर्पोरेशन कंपनीने झटपट बांधून तयार केली. यानंतर जुन्या इमारतीतील कारभार हालवून नवीन इमारतीत आणण्यात आला. मात्र बांधून पूर्ण झालेल्या इमारतीत कामे अपुरी व अर्धवट असल्याने गेले 2 इमारतीत किरकोळ कामे सुरूच आहेत. या कामांचे साहित्य हॉस्पिटलमध्ये जागोजागी पडून आहेत. सध्या गेल्या काही वर्षांपासून हॉस्पिलची जुनी इमारत बंद आहे. तर मोकळ्या जागेत विस्तार करण्यासाठी हॉस्पिटलच्या उर्वरित इमारतींचे काम गेले दहा वर्षे सुरू आहे. हे काम तीन वर्षांत कंत्राटदाराने पूर्ण करायचे होते. पण नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने उर्वरित इमारतींचे काम पूर्ण न केल्याने नवीन बांधण्यात आलेल्या पाच मजली हॉस्पिटलच्या इमारतीला ओसी मिळालेली नाही. इतकेच नव्हे तर या कंपनीला सरकारने आतापर्यंत अंदाजे 250 कोटी रुपये कामाचे अदा केले असल्याची धक्कादायक माहिती कामगारांच्या सूत्रांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More