कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात देशातील सर्व संघटनांचा दोन दिवस संप – eNavakal
महाराष्ट्र

कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात देशातील सर्व संघटनांचा दोन दिवस संप

अलिबाग – सध्याचे केंद्रातील सरकार सत्तेवर आल्यापासून मागील साडेचार वर्षापासून कामगार, शेतकरी व युकांचे प्रश्न जटील बनले आहेत. सरकारच्या आर्धीक धोरणांचा विपरीत परिणाम सर्वच कामगारांवर होत आहे. भांडवलदारांच्या हितासाठी सर्व धोरणे राबविली जात आहेत. त्यांच्या फायद्यासाठी कामगार कायद्यात मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहेत.

कामगारांना किमान वेतन देण्यात येत नाही. सामाजिक सुरक्षा काढून घेतली जात आहे. कायमस्वरुपी कामगार कपात करुन कंत्राटी तत्वावर नोकरभरती करण्यात येते. आट सोर्सींगद्वारे कामकाज केले जाते. देशात शेतकरी कर्जबाजारी होत आत्महत्या करीत आहे. तीच वेळ आता कामगारांवर येवून ठेपली आहे. नोकरी मिळणे व ती टिकवे खुप कठीण झाले आहे. या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्रीत येवून देशात 8 व 9 जानेवारी 2019 रोजी दोन दिवशीय सार्वत्रिक सं करण्याचा निर्णय घेतला आहे. संपाकरीता सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनीयन (सीटू) यांनी रायगड जिल्ह्यातून विशेष पुढाकार घेतला आहे. सदर संपातील प्रमुख मागण्यात प्रत्येक कामगाराला 18,000 रुपये किमान वेतन मिळालेच पाहिजे, कामगार कायद्यातील मालक धार्जीने बदल रद्द करा, फिक्सर्ड टर्म एम्प्लॉयमेंट (मर्यादीत कालावधीची नोकरी) रद्द करणे, कंत्राटी पध्दत बंद करा, नवीन रोजगार निर्माण करा, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण थांबवा, बोनस व भविष्य निर्वाह निधी देणेसंदर्भातील वाढते बदल थांबविणे, डी.पी.डी धोरण रद्द करा, महागाई कमी करा, आश्वासनाप्रमाणे काळेधन परत आणा, प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना प्रशिक्षण व कायमस्वरुपी नोकर्या द्या आदी प्रमुख मागण्यांचा समावेष आहे. ़

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळो! पुण्यात पुरुषांनी वटवृक्षाला मारल्या फेऱ्या

पुणे – आज राज्यभरात वटपौर्णिमेचा उत्साह आहे. आजच्या दिवशी वडाच्या झाडाला दोरी बांधून सात फेऱ्या मारतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी आजच्या दिवशी...
Read More
post-image
देश

नेपाळच्या शाळांमध्ये चीनी भाषेची सक्ती

काठमांडू – नेपाळमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चीनी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात अआले आहे. सध्या चीन आणि नेपाळ हे दोन देश अधिक जवळ येत असून भाषा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आपल्या १८ खासदारांसह आज अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More