काबूलमध्ये लग्न समारंभात बॉम्बस्फोट! ६३ ठार, शेकडो जखमी – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

काबूलमध्ये लग्न समारंभात बॉम्बस्फोट! ६३ ठार, शेकडो जखमी

काबूल – दहशतवादाशी झुंज देणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात जवळपास ६३ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका लग्न समारंभात शनिवारी रात्रीच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला असून या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. जखमींना तात्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याच्या १० दिवसांपूर्वीही काबूलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता यात ९५ जण जखमी झाले होते.

अफगाणिस्तान गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या नुसरत रहीमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हा आत्मघातकी हल्ला शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजताच्या सुमारास झाला असून या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. त्यामुळे या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याबाबत काहीच सांगता येत नाही.’

दरम्यान, काबूलमधील पश्चिमेकडील दुबई शहरात एका लग्न समारंभादरम्यान हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या समारंभात एक हजारहून अधिक लोक उपस्थित होते. तसेच या परिसरात शिया हजारा समुदायाच्या लोकांची संख्या अधिक आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More