‘कापसाला 6 हजार भाव द्या नाहीतर जीव देईल’ ना. गिरीष महाजनांचा व्हिडीओ व्हायरल – eNavakal
मुंबई राजकीय

‘कापसाला 6 हजार भाव द्या नाहीतर जीव देईल’ ना. गिरीष महाजनांचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई- राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी कापूस उत्पादक शेतकर्‍यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका करताना त्यांनी कापूस उत्पादक शेतकर्‍याला 6 हजार रुपये भाव मिळाला नाही तर तो जीव देईल, पोलिसांच्या गोळ्यांना सामोरे जाईल, असे म्हटले आहे.
गिरीष महाजन हे कदाचित एखाद्या उपोषण आंदोलनादरम्यान बोलत असावेत, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना पुढे असेही म्हटले आहे की, सर्वांनीच एकमुखी मागणी केली आहे की, कापसाला भाव वाढवून द्या, 6 हजार रुपये भाव द्या, अशी मागणी भाजप, सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी केली आहे. हे ऐकूण झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलाही निर्णय दिला नाही, विचार करतो आणि मग सांगतो, असे ते म्हणाले. पण या सरकारची कापूस उत्पादकांना भाव देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये संतापाची लाट पसरली आहे. आता आत्महत्या करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून पोलिसांच्या गोळ्यांना सामोरे जाण्याची तयारी त्यांनी केली आहे, असे या व्हिडीओमध्ये महाजन म्हणताना दिसत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More